डिजिटल गावकरी न्युज
दुर्गाप्रसाद घरतकर
येथील महाशिवरात्रीची यात्रा विदर्भामध्ये प्रसिद्ध असून जिल्हाभरातून तसेच लगतच्या भंडारा जिल्ह्यातूनही भाविक प्रतापगड येथील यात्रेत सहभागी होतात.
यामध्ये कित्येक यात्री प्रवासी वाहनांनी प्रतापगड गाठतात तर कित्येक भाविक स्वतःच्या वाहनांनी प्रतापगड गाठून महादेवाचे दर्शन घेतात. आपल्या वाहनाने येणाऱ्या भाविकांना त्यांचे वाहन ठेवताना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या संख्येत भाविक प्रवासी वाहनांनीच येत असल्याने त्यांची सोय करणे गरजेचे असते. यामुळेच यात्रेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करवून दिल्या आहेत तसेच यात्रेला दूर वरून येणाऱ्या भाविकांना ये-जा करताना गैरसोय होऊ नये यासाठी गोंदिया आगाराकडून बसेसचीही व्यवस्था केली जाते. त्यानुसार, यंदा गोंदिया आगाराने पाच बसेसची व्यवस्थान केली आहे. या बसेसद्वारे भाविकांना प्रतापगड पर्यंत सोडून तेथून परत आणण्याची सोय केली जाणार आहे.
0 टिप्पण्या