डिजिटल गावकरी न्युज
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीतील प्रमुख नावांमध्ये काँग्रेस नेते कमलनाथ यांचा मुलगा नकुल नाथ, अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे आसाममधून एकूण 12 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, तर मध्य प्रदेशमधून 10, गुजरातमधून 7, राजस्थानमधून 10, उत्तराखंडमधून तीन आणि दमण आणि दीवमधून एक उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, “आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आज आपण दुसरी यादी जाहीर करणार आहोत. काल, सीईसीने आसाम, मध्य प्रदेश, राजस्थानमधील सुमारे 43 नावांची यादी भेटून मंजूर केली आहे ती पुढील प्रमाणे आहे हे उमेदवार 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक लढवणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचे उमेदवारांची संपूर्ण यादी
क्र. राज्ये लोकसभा जागा उमेदवाराचे नाव
1 आसाम कोक्राझार - एसटी गर्जन मशारी
2 आसाम धुबरी -रकीबुल हसन
3 आसाम बारपेटा - दीप बायन
4 आसाम दररंग - उदलगुरी माधब राजबंशी
5 आसाम गुवाहाटी मीरा बर्थकूर गोस्वामी
6 आसाम दिफू - एसटी जॉयराम एंगलेंग
7 आसाम करीमगंज - हाफिज रशीद अहमद चौधरी
8 आसाम सिलचर - एससी सुर्ज्या कांता सरकार
9 आसाम नागाव - प्रद्युत बोरदोलोई
10 आसाम काझीरंगा - रोसेलिना टिर्की
11 आसाम सोनितपूर - प्रेम लाल गंजू
12 आसाम जोरहाट - गौरव गोगोई
13 गुजरात कच्छ - नितीशभाई लालन
14 गुजरात बनासकांठा -गेनीबेन ठाकूर
15 गुजरात अहमदाबाद- पूर्व रोहन गुप्ता
16 गुजरात अहमदाबाद पश्चिम- भरत मकवाना
17 गुजरात पोरबंदर- ललितभाई वसोया
18 गुजरात बारडोली -सिद्धार्थ चौधरी
१९ गुजरात वलसाड- अनंतभाई पटेल
20 मध्य प्रदेश भिंड- फूलसिंग बरैया
21 मध्य प्रदेश टिकमगड - पंकज अहिरवार
22 मध्य प्रदेश सांता -सिद्धार्थ कुशवाह
23 मध्य प्रदेश सिद्धी - कमलेश्वर पटेल
24 मध्य प्रदेश मंडला - ओंकार सिंग मरकम
25 मध्य प्रदेश छिंदवाडा - नकुल नाथ
26 मध्य प्रदेश देवास- राजेद्र मालवीय
27 मध्य प्रदेश धार- राधेश्याम मुवेल
28 मध्य प्रदेश खरगोन- पोरलाल खरटे
29 मध्य प्रदेश बैतुल - रामू टेकम
30 राजस्थान बिकानेर - गोविंद राम मेघवाल
31 राजस्थान चुरू -राहुल कासवान
32 राजस्थान झुंझुनू - ब्रिजेंद्र ओला
33 राजस्थान अलवर -ललित यादव
34 राजस्थान भरतपूर - संजना जाटव
35 राजस्थान टोंक -हरिशचंद्र मीना
36 राजस्थान जोधपूर - करणसिंग उचियार्डा
37 राजस्थान जालोर - वैभव गेहलोत
38 राजस्थान उदयपूर - ताराचंद मीना
39 राजस्थान चित्तोडगड- उदयलाल अजाना
40 उत्तराखंड टिहरी - गढवाल जोतसिंग गुंटसोला
41 उत्तराखंड गढवाल - गणेश गोदियाल
42 उत्तराखंड अल्मोडा- प्रदीप तमटा
43 दमण आणि दीव - केतन दह्याभाई पटेल
दिनांक ८ मार्च रोजी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती जुन्या पक्षाने जाहीर केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये राहुल गांधी, भूपेश बघेल आणि शशी थरूर इत्यादी जुन्या नेत्यांचा समावेश आहे.
0 टिप्पण्या