शबरी घरकुल योजना 2 लाख 50 हजार रुपये अनुदान


शबरी घरकुल योजना Sabari gharkul Yojana संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना ही महाराष्ट्र राज्यातील समाज कल्याण विभागातर्फे राबविली जाणारी एक घरकुल योजना आहे.या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला दोन लाख पन्नास हजारापर्यंत आर्थिक मदत देण्यात येते. आतापर्यंत कितीतरी लोकांनी या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य मध्ये घेतला आहे तुम्ही जर अनुसूचित जमातीमध्ये येत असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता.

या योजनेमध्ये घरकुलच्या निधी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.या योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा करायचा कोठे करायचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते लाभार्थी पात्र आहे आणि लाभ घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती लागतात ही सर्व माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या योजनेचा लाभ नक्की या.

जर तुम्हाला या योजनेचा अर्ज हवा असेल तर तो सुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लेखाच्या शेवटी तुम्ही अर्ज आणि जीआर डाऊनलोड करू शकता. या जीआर च खाली अर्ज दिलेला आहे.

शबरी घरकुल योजना लाभ घेण्यासाठी कोणते लाभार्थी आहे पात्र ते पहा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

या योजनेचा लाभ घेण्याकरता लाभार्थी अनुसूचित जाती जमातीचा असावा याच प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

जो लाभार्थी अर्ज करणार आहे तो लाभार्थी मागील पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

या योजनेचा लाभ घेण्याकरता लाभार्थी अनुसूचित जाती जमातीचा असावा याच प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

जो लाभार्थी अर्ज करणार आहे तो लाभार्थी मागील पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

लाभार्थ्याकडे स्वतःचे पक्के घर नसावे.लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी एक लाखापेक्षा कमी असावे तसेच जे लाभार्थी नगरपरिषदेचे आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे.

जे लाभार्थी महानगर परिषदेचे आहे त्यांना दोन ते अडीच लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

शबरी योजनेसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक लागतात ते पहा.

लाभार्थ्यांचे रहिवासी प्रमाणपत्र.

कास्ट सर्टिफिकेट.

मोबाईल क्रमांक.

उत्पन्न प्रमाणपत्र.

ईमेल आयडी.

वयाचे प्रमाणपत्र.

जमिनीचा सातबारा आणि आठ अ.

लाभार्थ्याची बँक खाते पासबुक.

ना हरकत प्रमाणपत्र (ग्रामपंचायतचे)

वरील सर्व कागदपत्रे लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक लागणार आहेत.

ही योजना राबविण्यात मागचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती जमाती मधल्या लाभार्थ्यांना राहण्यासाठी एक पक्का स्वतःचे घर उपलब्ध करून देणे आहे आणि या भारतामधील अनुसूचित जातींच्या लोकांचे सामाजिक विकास करण्याच्या उद्देश आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

शबरी घरकुल योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.हा अर्ज तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कडे सादर करावा लागणार आहे.

तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन शासकीय योजनांची माहिती मिळेल.

शबरी घरकुल योजना अर्ज डाऊनलोड करण्याची लिंक
👇👇👇

https://drive.google.com/file/d/17Etq6AQX83y-1-jR6j92AKr7qRtElwJw/view?usp=drivesdk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या