डिजिटल गावकरी न्युज
दुर्गाप्रसाद घरतकर/अर्जुनी मोरगाव
दिनांक ४ फेब्रुवारीला अर्जुनी मोरगाव काँग्रेस कमेटी यांचे संयुक्त विद्यमाने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन सरस्वती विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी/मोरगाव या ठिकाणी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, उद्घाटक प्रणिती शिंदे तर प्रमुख वक्ते म्हणून अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड ह्या उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आ.अभिजीत वंजारी, आ. शेषराव कोरोटे, गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बंसोड, पी.जी. कटरे, अमर वऱ्हाडे, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, सौ. वंदना काळे, भागवत नाकाडे, झामसिंग बघेले, घनश्याम धामट, मधुसुदन दोनोडे, देमेंद्र रहांगडाले, प्रमोद पाऊलझगडे, राजु पालीवाल, सौ. शिला उईके, सौ. किरण हटवार, कृष्णा शहारे, चंद्रकला ठवरे आदी उपस्थित राहणार आहेत.
या महिला मेळाव्याचे उद्दिष्टे म्हणजे महिला सक्षमीकरण करणे
महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या जोमाने विकासकामांत सहभागी व्हाव्यात यासाठी त्यांना संबोधन करणे त्याचबरोबर महिला बचत गट, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आदी विविध योजना वेगवेगळ्या योजनेची माहिती आणि त्यांचा लाभ कसा घेता येईल आणि महिलांचा सर्व शेत्रात विकास कश्याप्रकारे करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरीपण या महिला मेळाव्याला जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक आणि अर्जुनी मोरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री अनिल सुखदेवराव दहिवले व प्रा. सौ. नुतन अनिल दहिवले तथा मित्र परिवार आणि तालुका काँग्रेस कमेटी, महिला कॉंग्रेस कमेटी व युवक काँग्रेस कमेटी अर्जुनी मोरगाव यांनी केले आहे.
0 टिप्पण्या