गोंदियामधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न


गोंदियामधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न

डिजिटल गावकरी
दूर्गाप्रसाद घरतकर

दिनांक 11 फेब्रुवारीला गोंदियामधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती माननीय श्री. जगदीप धनखड़ जी, राष्ट्रवादीचे नेते श्री प्रफुल्ल पटेल,महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री. रमेश बैस जी, मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ शिंदे जी, गोंदियाचे पालकमंत्री मा. श्री. धर्मरावबाबा आत्राम जी, वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री. हसन मुश्रीफ जी यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी गोंदिया येथील विद्यार्थ्यांना नागपूर येथे वा दूरवर जावे लागत होते. परंतु आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध झालेली असून त्यांची आर्थिक व वेळेची बचत होणार आहे. 690 कोटींच्या निधीतून या महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक सुविधेंसह 400 बेडची क्षमता राहणार आहे. या नवीन इमारतीमुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा सुविधा मिळतील तसेच परिसरातील लोकांच्या आरोग्य सेवांच्या गरजाही पूर्ण होतील. गोंदिया जिल्ह्याच्या आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य लाभणार असल्याची ग्वाही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थितांना दिली.

या भूमिपूजन सोहळ्यास खासदार डॉ. श्री. श्रीकांत शिंदे जी, श्री. सुनील मेंढे जी, डॉ. श्री. सी.एम. रमेश जी, आमदार श्री. विनोद अग्रवाल जी, श्री. विजय रहांगडाले जी, श्री. राजू कारेमोरे जी, श्री. मनोहर चंद्रिकापुरे जी, श्री. सहसराम कोरेटे जी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान श्री. सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त श्री. राजीव निवतकर व अधिष्ठाता डॉ. श्री. कुसुमाकर घोरपडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या