गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न प्रफुल्ल पटेल यांनी केले मार्गदर्शन.


डिजिटल गावकरी न्युज
अर्जुनी मोरगाव/दुर्गाप्रसाद घरतकर

गोंदिया येथे एन. एम. डी. महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा 27 जानेवारीलां संपन्न झाला. या मेळाव्याला प्रफुल्ल पटेल यांनी संबोधित केले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गठबंधन जरी असले तरी पार्टीने, विचारधारा, ध्येय-धोरणांशी तडजोड केलेली नाही. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा, या क्षेत्रातील समस्या मार्गी लागव्यात व मोठे प्रकल्प येऊन रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आपला सदैव प्रयत्न असणार आहे. असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी बोनस, दोन्ही जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी सिंचनाचे प्रकल्प वा अन्य कुठल्याही प्रकल्पात अडचण आल्यास मी पुढाकार घेऊन ते मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही उपस्थितांना
दिली.

तसेच या मेळाव्याला माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, इंजिनियर यशवंत गणवीर तसेच जिल्हयातील मान्यवर, तालुका व शहर अध्यक्ष, जि.प सदस्य,प.स.सदस्य, न.प.सदस्य, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या