अर्जुनीत मोरगाव येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन होणार राम नामाचा गजर
डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर
अर्जुनी-मोरगाव येथे असलेल्या राम मंदिरात सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक रांगोळी व रोषणाईने राम मंदिर परिसर अगदी सज्ज झालाय. श्रीराम मंदिर समितीच्या वतीने सोमवारी (दि. २२) सकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
अर्जुनी येथील राम मंदिर हे नगरवासीयांचे श्रद्धास्थान आहे. या आतापर्यंत मंदिराला ५५ वर्ष पूर्ण होत आहेत रामभक्त स्व सुंदरलाल जयरामसाव राजभोज यांनी छोटाभाई जेठाभाई
पटेल यांच्याकडून जमीन खरेदी केली आणि त्याठिकाणी श्रीराम मंदिराची स्थापना केली. याठिकाणी ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने येथे पूजा अर्चना करतात. रामनवमीला तर मोठी यात्रा व कार्यक्रम असते. दरवर्षी रामनवमी व हनुमान जयंतीला येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
आज पाचशे वर्षाचा संघर्ष आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत २२जानेवारीला अयोध्या मध्ये रामलल्ला विराजमान होणार आहेत. हा महाउत्सव देशभर साजरा होतो आहे. याच पार्श्वभूमीवर अर्जुनी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा उत्सव समिती अर्जुनी मोरगावच्या वतीने सकाळी ९ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा दुर्गा चौक येथून प्रारंभ होईल आणि संपूर्ण अर्जुनी मध्ये शोभायात्रा काढण्यात येणार आहे .
0 टिप्पण्या