अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयात 75 वा प्रजासत्ताक दीन साजरा! "राजे ग्रुप" च्यावतीने विद्यार्थांसाठी अल्पोआहाराचे वाटप .



डिजिटल गावकरी न्युज
दुर्गाप्रसाद घरतकर

दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालय येथे प्रजासत्ताक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अर्जुनी मोरगाव तहसील चे तहसीलदार श्री अनिरुद्ध कांबळे व उपजिल्हा दंडाधिकारी मां.विजयकुमार सूर्यवंशी, तसेच नायब तहसीलदार यांनी झेंडावंदन करून मानवंदना दिल्या.

त्यांनतर अर्जुनी मोरगाव येथील शालेय विद्यार्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले या कार्यक्रमाला तहसीलदार श्री अनिरुद्ध कांबळे , मां .विजयकुमार सूर्यवंशी उपजिल्हा दंडाधिकारी व श्री. मां पठाण सर, मेश्राम सर, कापगते सर तसेच शालेय बालके, शिक्षक, कर्मचारी, आणि तहसील कार्यालय येथील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला, जिल्हा परिषद शाळा, सरस्वती विद्यालय, सिद्धिविनायक स्कूल, न्यूमून हायस्कूल, शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज, एस अध्यापक कॉलेज अर्जुनी मोरगाव इत्यादी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने देशभक्तीवर कार्यक्रम सादर केले व त्यांना तहसील कार्यालयाच्या वतीने त्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.

"राजे ग्रुप" अर्जुनी मोरगाव च्यावतीने विद्यार्थांसाठी अल्पोआहर वाटप करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अर्जुनी तहसील या ठिकाणी सामाजिक क्रांतीची युवा पहल "राजे ग्रुप" अर्जुनी मोरगाव च्या वतीने आज ७५ व्या प्रजासत्ताक दिना प्रीत्यर्थ ध्वजारोहण करीता आलेल्या शालेय बालके, शिक्षक, कर्मचारी, नगरवासी करीता अल्पोआहाराची वाटप करण्यात आले होते. 

यावेळी राजे ग्रुप चे सदस्य प्रजय कोरे,अतुल बंसोड,मीनल बहेकर,आशिष हातझाडे,केतन खंडाईत,ओंकार खंडाते,
जितू हातझाडे,चेतन भाऊ कोरे,अभिजित चांदेवार,सुमित शुक्ला,गोलू रणदिवे,शुभम फुलेवार,किशोर भाऊ फुंडे ,छत्रपाल कापगते ,सचिन भाऊ गहाणे ,प्रसन्न फुंडे ,रुपेश बाळबुधे,राजू ब्रामणकर ,अंकित पशिने,पवन सांगोडे,पिंटू हातझाडे,शिर्ष लोगडे ,अश्विन गौतम ,स्वप्नील वाढाई ,लीलाधर राठी,दिपांशू चुटे यांनी खूप चांगली कामगिरी बजावली होती.

राजे ग्रुप हे अर्जुनी तालुक्यामध्ये सार्वजनिक काम कार्यात सामजिक हिताच्या दृष्टीने वेळोवेळी चांगले कामे करून लोकांची मने जिंकली आहेत या कार्यक्रमाच्याप्रसंगी राजे ग्रुपच्या सर्व मेंबरचे तहसील कार्यालयाच्या वतीने पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या