डिजिटल मिडिया
दुर्गाप्रसाद घरतकर
चंद्रपूर जिल्हा : सिंदेवाही परिसरात मागील अनेक दिवसांपासून सिंदेवाही वनपरीक्षेत्रातील जंगल व लागून असलेल्या शेतशिवारांत भटकणाऱ्या व शेतीचे नुकसान करणाऱ्या 'त्या' हत्तीचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना सिंदेवाही वनपरीक्षेत्रातील चिटकी शेतशिवारात आज सकाळी उघडकीस आली आहे.
शेतामध्ये जंगली श्वापदांकडून होणाऱ्या नुकसानीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी परीसरातील शेतकरी शेतकुंपनांना विद्युत करंट लावतात. अशाच एका खाजगी शेतानजीक गेल्याने आणि विद्युत करंटाचा स्पर्श झाल्याने उपक्षेत्र तांबेगडी मेंढा अंतर्गत येणाऱ्या मुरपार बीटामधील चिटकी गावातील शेतशिवारात आज सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास सदर हत्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी
आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले असून हत्तींचा मृत्यू विज प्रवाहाच्या आघाताने झाल्याच्या अंदाजावरून अशोक पांडूरंग बोरकर वय ५६ रा. चिटकी व अजय अशोक बोरकर वय २९ या चिटकीयांचे विरूद्ध पिओआर.क्र ०९१३०/२२८२३१ अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आले आहे. चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले असून त्याची एम बी चोपडे सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्यजिव ) ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी हे सखोल चौकशी करीत आहेत.
0 टिप्पण्या