प्रेयसी सोबत रात्रीसाठी हॉटेलवर (लॉज) जाणे किती योग्य आहे पहा ?


नमस्कार मित्रांनो मी दुर्गाप्रसाद घरतकर (मराठी ब्लॉगर) मित्रानो कामातुरानां न लज्जा न भयं " , हे प्रसिद्ध आहे.एकदा का कुठल्या गोष्टीची चटक लागली की जीवाचा चैन ,आराम संपला.माणूस बुद्धि गहाण ठेवून स्वतः चा राहत नाही.मग रात्र काय आणि दिवस काय दोन्ही सारखेच लागायला लागतात प्रियकर प्रेयसी एकमेकाच्या प्रेमात धुंध असतात त्यांची कामवासना जागृत होते आणि ते विविध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी बाहेर पडतात पण त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही याचा परिणाम कसा होतो ते जाणून घेणार आहोत.


रात्री बेरात्री घराच्या बाहेर पडणेच योग्य नाही.मुलींना तर नाहीच नाही.मराठीत एक पिक्चर आला होता " सात च्या आत घरात ".चांगला विषय होता.


बीअर बार,लॉज यांच्या आजुबाजूला अनेक वाईट धंदे चालतात ती चालवणारी माणसे सुद्धा वाईट विचार वृत्तीची असतात. कावळ्याच्या नजरे सारखे त्यांचे बारिक लक्ष सगळीकडे असते त्यांच्यानजरेतुन काहीच सुटत नाही.पुरुषा पेक्षा ती मुलगी त्यांच्या बरोबर ध्यानात राहील. परिणाम वाईट होतील हे सांगायलाच नको.लॉज वर जाण्याची मानसिक तयारी पुरूषाची झालेली असते.काही अनुचित प्रकार घडल्यास तो निभावून नेऊ शकेल पण मुलीने लॉज वर जाण्यास संमती देणे म्हणजे बेशरमपणाचा कळस गाठला असून तीला कुणाच्याही इज्जतीची पर्वा नाही असेच म्हणावे लागेल. तिच्यावर कुठलाही प्रसंग आलाच तर ती सुद्धा परिणामांना तोंड देण्यास तयार आहे हे निश्चित.


प्रेमिकांनी बाग बगीचयात ( गार्डन) भेटणे ,हिंडणे फिरणे एकवेळ ठीक आहे. सर्व शरिर पर पुरुषाच्या स्वाधीन करून त्याची लत (चटक ) लग्ना आधीच लावून घेतल्यावर लग्नानंतर काहीच करायचे उरत नाही.पुरुष कानावर हात देऊ शकेल.


रात्री कुठल्याही लॉज ची पोलिसांकडून झडती घेण्यात येत असून पोलीस नाना तर्‍हेचे प्रश्न विचारून भंडावून सोडतात. बहुतेक स्टाफ प्यायलेला असतो.वय कमी असेल तर कायदेशीर कारवाई होऊ शकेल. जी मुले रात्री घराबाहेर किंवा उशिरापर्यंत राहतात ती चारित्र्यहीन असतात त्यांना खोटे बोलायची सवय झालीय पुढे आयुष्यात अनेक चुका ते सहज करु शकतात.


त्या मुलाला दमदाटी करून इतर टगेलोक त्या मुलीवर बलात्कार करू शकतात जर प्रियकर मध्ये पडला तर जिवाशी खेळ खेळावा लागेल पोलीसस्टेशनचं लफडे पाठीमागे लागेल.


दिवसा रात्री कधीही लॉज वर जाऊ नये.हल्लीतर काऊंटर वर सी.सी. कॅमेरे लावलेले असतात, आधार कार्ड, लायसन्स कार्ड, काहीतरी ओळख पत्र द्यावे लागते,मोबाईल नंबर सुद्धा द्यावा लागतो.छुप्या कॅमेर्‍यात फिल्म काढली जाऊ शकते.आणि त्याचे व्हिडिओ शोशल मीडिया वर शेयर केले जाऊ शकतात.आणि नंतर त्याण्या  ब्लैकमैल करून त्यांची फसवणुक केली जाते त्यांना दमक्या दिल्या जातात आणि समाजामध्ये अश्या गोष्टी लवकर पसरतात यामध्ये जर घरच्यांना ह्या गोष्टी माहीत झाल्यास त्यांना मात्र समाजामध्ये मान खाली घालुन चालावे लागते म्हणून मित्रांनो अशा अनेक गोष्टींना तोंड देत शरीरसुखासाठी चटावलेलया जोडप्यात नीतिमत्ता शिल्लक असेल असेमला वाटत नाही. आणि त्यांचे नंतरचे जीवन हे नक्की वेदनादायी   आणी दुःखी होत असते असे मला वाटते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या