पांगोली नदीत विद्यार्थी बुडाला, शोध मोहीम सुरू
गोंदिया: शहरातील करिअर झोन या एज्युकेशन इन्स्टिट्युटचे चार विद्यार्थी मंगळवारी सकाळी शहरालगतच्या रेल्वे पुलाजवळील पांगोली नदीवर आंघोळीसाठी गेले होते. नदीमध्ये आंघोळ करीत असताना यशराज धिरेंद्रसिंह रघुवंशी (१७) हा विद्यार्थी नदीत बुडला. तर तीन मित्र सुखरुप बचावले.
त्याच्या मित्रांनी याची माहिती जवळ असलेल्या नागरिकांना दिली. ग्रामीण पोलिस स्टेशन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूला मिळताच शोध व बचाव पथक घटनास्थळी पोहचत नदीत बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध घेणे सुरू केले आहे.
0 टिप्पण्या