महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बैलपोळा सण का साजरा केला जातो ?

 डिजिटल गावकरी
   दुर्गाप्रसाद घरतकर

नमस्कार मंडळी,बैल पोळा हा एक पारंपारिक मराठी सण आहे जो दरवर्षी श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी शेतकऱ्यांनी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे कौतुक आणि आभार मानण्यासाठी शेतकरी हा बैलं पोळ्याचा सण साजरा करतात .

मित्रांनो बैल पोळा हा एक कृषी-आधारित सण आहे जो भारतातील शेतकरी समुदायासाठी विशेष महत्त्वाचा आहे.

बैल पोळ्याच्या दिवशीशेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यांना नवीन झूल, बेगड, बाशिंग, कवड्या, घुंगरे, वेसण, कासरा आणि पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घातले जातात.

बैलांची पूजा करून त्यांना गोड-धोड नैवेद्य दिला जातो. बैलांना सजवूनगावामधे मिरवणूक काढली जाते त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना केली जाते बैल पोळ्याची पौराणिक कथा अशी आहे की, एकदा कृष्णाने पोलासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि तो दिवस श्रावण अमावस्या होता. म्हणून, हा दिवस बैल पोळा म्हणून साजरा केला जातो असे पूर्वीच्या लोकांचे म्हणणे आहे .

आमच्या सुकळी गावामधे सुधा बैल पोळा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो हा एक आनंददायी आणि उत्साही सण आहे जो शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटकाचे कौतुक करतो. गावामधे हा बैलं पोळ्याचा सनाला खूप महत्व दिले जाते महाराष्ट्रामध्ये हा सण शेतीच्या महत्त्वावर आणि बैलांच्या अविभाज्य योगदानावर त्यांचे उपकार फेडण्यासाठी हा सण मोठ्या आनंदाने गावा गावामधे साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या