डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना2023
अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता एकच राबविण्याचा निर्णय शासनाने एप्रिल 2016 च्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.
कृषि स्वावलंबन योजना लाभाचे स्वरूप
नवीन विहीरीसाठी उच्चतम अनुदान मर्यादा- 2. 5 लक्ष रुपये.
जुनी विहीर दुरुस्तीसाठी- 50 हजार रुपये
इनवेल बोअरींगसाठी- 20 हजार रुपये
पंप संच- 25 हजार रुपये
वीज जोडणी आकार- 10 हजार रुपये
शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण- 1 लक्ष रुपये
बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या अटी
लाभार्थी हा अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी असावा.
शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत:च्या नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे. लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व ते बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य. दारिद्र्यरेषेखालील नसलेले अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तेच लाभार्थी लाभ घेण्यास पात्र राहतील.
दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल)यादीत अंतर्भूत शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पनाच्या मर्यादेची अट राहणार नाही. परंतु ज्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या मर्यादेत आहे.
बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
उत्पन्नाचा दाखला
जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ उतारा
आधारकार्ड
बँक पासबुक प्रत
फार्म भरण्याचे संपर्काचे ठिकाण
गट विकास अधिकारी, पंचायत समिती, कृषी अधिकारी (वि.घ.यो.)
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट
0 टिप्पण्या