महाराष्ट्रामध्ये डोळ्यांचा आजार वाढतोय काय आहे कंजक्टिव्हायटीस आजर आणि याचे उपाय

पावसाळा म्हटलं की साथीचे आजार पसरण्याचं प्रमाण एकदम वाढीस लागतं आणि त्यातही पावसाळ्यात डोळ्यांचे आजार प्रचंड प्रमाणात वाढतात पण यावर्षी तर कहरच झालाय आणि या आजाराला कंजक्टिव्हायटीस आजार म्हणतात . 

दिल्लीमध्ये कंजक्टिव्हायटीसचं प्रमाण दिवसागणिक वाढतय, दिवसाला १०० पेक्षा जास्त केसेस रिपोर्ट होतायत तर महाराष्ट्रात आळंदी भागातही डोळे येण्याचं प्रमाण खूप वाढतंय. पुणे जिल्ह्यातल्या आळंदी नगरपालिकेच्या हद्दीत गेल्या चार- आठ दिवसांपासून डोळ्यांच्या आजारांचं प्रमाण वाढतय.

मागच्या काही दिवसांत डोळ्यांच्या या आजाराचे एकूण रुग्ण सुमारे १७०० च्या आसपास आढळून आलेत आणि यात लहान मुलांची संख्या जास्त आहे. तर एकूणच या पार्श्वभूमीवर आज आपण या डोळ्याच्या आजाराची कारणं, लक्षणं, परिणाम, उपाय, घ्यायची काळजी, आणि डॉक्टरांचं म्हणणं या सगळ्यावर नजर टाकणार आहोत.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये डोळ्यांच्या आजार वाढत आहे.

महाराष्ट्रात डोळ्यांचा संसर्ग आजार हा वाढत आहे यामध्ये पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक, यवतमाळ , नागपूर , गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता डोळ्यांचा आजाराची रुग्ण आढळले आहेत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक डोळ्यांचे रुग्ण आढळले आहेत .

डोळ्यांचा संसर्ग आजार का वाढत आहे याची कारणे काय आहेत.

डोळ्याच्या आजर हा पावसाळ्यात नक्की येत असतो यामध्ये डोळे लाल होणे, डोळ्यात पाणी येणे, डोळे खाजवणे, डोळे दुखणे असे प्रकार या आजाराचे लक्षण आहेत . यामागे पावसाळ्यामध्ये खराब वातावणानुसार, खराब पाणी, धूळ, आणि वरून पडणारा पाणी हा अंगावर घेणे तसेच तसेच ढगाळ वातावरणात काम करणे या सर्व गोष्टी या आजाराला कारणीभूत आहेत.

पीएमसीचे आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार म्हणाले की, महाराष्ट्रात नेत्रश्लेष्मलाशोथ आणि इतर डोळ्यांच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत आणि वॉर्ड वैद्यकीय अधिकारी आणि झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना नेत्रश्लेष्मलाशोथची प्रकरणे आढळलेल्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सांगितले आहे कारण हा आजार संसर्गजन्य असून तो एका ऋग्नपासून जवळच्या माणसाला होऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे .

डोळ्यांच्या संसर्गाचा आजार कमी करण्यासाठी उपाय

यामध्ये पावसाळ्यामध्ये आपले हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे , विशेषत: शौचालय वापरल्यानंतर, नाक फुंकणे किंवा डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. डोळ्यांच्या संसर्गाची लागण झालेल्या लोकांसोबत टॉवेल, उशा आणि इतर वैयक्तिक वस्तू वापर करणे टाळणे देखील महत्त्वाचे आहे.

डोळेेेे चोळणे टाळा डोळ्यांना वारंवार हात लावू नये .

उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सनग्लासेस चस्मे घाला.

दूषित पाण्यात पोहणे टाळा किवा पावसाळ्यातील पाणी डोक्यावर आणि अंगावर घेऊ नका .

जर तुम्हाला डोळा संसर्ग झाला असेल तर योग्य उपचार घेण्यासाठी डॉक्टरांना लगेच भेटा.

एखाद्या व्यक्तीला डोळ्यांचा आजार झाला असेल अशा व्यक्ती पासून दूर राहा आणि त्यांच्या डोळ्यांकडे पाहणे बंद करा.

या सर्व गोष्टी करून, आपण आपले डोळे निरोगी ठेवण्यास आणि डोळ्यांच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या