हत्तीने केले अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली येथील शेतपिकांचे नुकसान


भरनोली शिवरामटोला येथील शेतपिकांचे नुकसान : वन विभागाने वाढविली सुरक्षा 

डिजिटल गावकरी 

केशोरी : मागील पाच ते सहा दिवसांपासून हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (दि.१९) रात्री या कळपाने उमरपायलीपासून ५ कि. मी. अंतरावर असलेल्या शिवरामटोला, भरनोली, राजोली नवीनटोला ईळदा या परिसरातील शेतशिवारात धुमाकूळ घालून २० शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या पऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान केली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.

खूप दिवस झाले हत्तींचा कळप या परिसरातून परत जात नसल्याने शेतकरी लोक मात्र चिंताग्रस्त आहेत कारण आता रोविनी सुरू झाली आहेत.

यापूर्वीही पश्चिम बंगालमधून २५ ते ३० हत्तींचे कळप गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले होते. दोन महिने या कळपांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. एका शेतकऱ्याचा बळीही घेतला होता. एका शेतकऱ्याला गंभीर जखमी केले होते तर नागणडोह येथील २० ते २५ झोपड्या भुईसपाट केल्याने तेथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी आश्रय घेऊन राहण्याची वेळ आली.

त्यानंतर हा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात परत गेला होता. मात्र, आठ दिवसांपूर्वी हा कळप पुन्हा गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील
शिवरामटोला येथील शेतशिवारात हत्तीच्या कळपाने धुमाकूळ असे धानपिकाचे नुकसान केले होते.

हत्यानी उमरपायलीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या शिवरामटोला, राजोली, भरनोली या गावांकडे धाव घेतली आहे. बुधवारी रात्री येथील शेतशिवारात धुमाकूळ घालून धानाच्या पन्हयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

 त्यामुळे रोवणीसाठी पन्हे आणायचे कुठून? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कारण पावसाळा सुरू झाला असून शेतकऱ्यांनी शेतामध्ये रोवणी ला सूर्वात केली आहे खरीप हंगामाची कामे करायची की हत्तींच्या कळपासाठी जागरण करायचे, अशी मोठी बिकट समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.

वन विभागाने या विषयी घेतली दखल

या गावातील हत्तींच्या कळपाने नुकसान केलेल्या धानाच्या पह्यांची वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. तेलंग, ए.आर. मेश्राम, वनरक्षक वाय. जी.परशुरामकर यांनी गुरुवारी (दि.२०) घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव वरिष्ठा अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या