चप्पल जुते शिवणाऱ्या बापाची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक | खुशबू बरैय्या | अर्जुनी मोरगाव


Writing by / दुर्गाप्रसाद घरतकर 
गोंदिया-अर्जुनी मोरगाव : जीवनामध्ये कोणतेही ध्येय प्राप्त करण्यासाठी मनामधे मनात प्रचंड आत्मविश्वास, जिद्द असणे आवश्यक आहे. दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या खुशबू प्रल्हाद बरैय्या रा. अर्जुनी मोरगाव या २५ वर्षीय युवतीने स्पर्धात्मक परीक्षेचे कोणतेही वर्ग न लावता गावामध्ये राहून नियमित अवांतर अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. तिच्या अथक परिश्रमाला यश येऊन चप्पल-जोडे शिवणाऱ्याची मुलगी खुशबू आता पोलिस उपनिरीक्षक होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट 'ब' मुख्य परीक्षा २०२० अंतर्गत पोलिस उपनिरीक्षकपदाची तात्पुरती निवड यादी मंगळवारी (दि. ४) जाहीर करण्यात आली. त्यात अर्जुनी मोरगाव येथील खुशबू प्रल्हाद बरैय्या या २५ वर्षीय युवतीने ३६४ गुण मिळवून पोलिस उपनिरीक्षक पदावर आपले स्थान निश्चित केले.

खुबशूच्या या असामान्य यशाबद्दल अर्जुनी तालुक्यामध्ये तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये तिचे कौतुक केले जात आहे.

प्रल्हाद बरैय्या यांचे अर्जुनी येथे लहानसे दुकान थाटून चप्पल, जोडे शिवण्याचे काम करतात. प्रधानमंत्री आवास योजना शहरीअंतर्गत लाभ मिळालेल्या दोन खोल्यांच्या झोपडीवजा घरात पत्नी, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह राहतात. प्रल्हाद बरैया आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. प्रल्हाद यांनासुद्धा शिक्षणाची आवड आहे. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणापासून प्रगती नाही याची जाण त्यांना वेळोवेळी होत असल्याने त्यांनी तिन्ही मुलांच्या शिक्षणात कोणतीही उणीव भासू दिली नाही. आपले मुले शिक्षण घेऊन शासकीय पदावर कार्यरत राहावे, अशी त्यांची अपेक्षा होती. प्रल्हाद बरैय्या यांची पत्नी उर्मिला या प्रकृती बरी नसल्याने संपूर्ण कुटुंबाची सर्वतोपरी जबाबदारी एकट्या प्रल्हाद बरैय्या यांच्यावर आहे. मुलांनी शिकावे, अशी त्यांची प्रबळ इच्छा आहे.

खुशबू ने अभ्यासासाठी सोय नसतानासुद्धा झोपडीवजा घरातील दिवा 'खुशबू'च्या रूपाने मात्र ताऱ्याप्रमाणे चकाकला. जन्मदात्या मायबापाच्या प्रयत्नाला तिघाही मुलांनी कुठेही गालबोट लागू दिले नाही. स्वत: कष्ट उपसून, त्रास भोगून प्रल्हाद बरैय्या यांनी तिन्ही मुलांच्या शिक्षणासाठी चप्पल, जोडे पॉलीश, दुरुस्तीचे काम करून पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिक्षित करण्याचा ध्यास घेतला .

मित्रांनो खुशबू सुरुवातीपासून अभ्यासात हुशार होती सरस्वती विद्यालयातून ७४.६० टक्के गुण घेऊन बारावी उत्तीर्ण झाली. एस. एस. जे. महाविद्यालयातून बीएससी ७६.६७ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण. एमएससी (गणित) २०१९ पासून तीने लोकसेवा आयोग परीक्षेची तयारीला सुरुवात केली. आणि या तयारीचे फळ मात्र खुशबूला मिळाले आहे.

पोलिश स्टेशन च्या वाचनालयात बसून केला अभ्यास

अर्जुनी मोरगाव पोलिस स्टेशनच्या वाचनालयात खुशबूने आपले यशस्वी भविष्य घडविले. नित्यनेम सकाळी आठ वाजता खुशबू वाचनालयात जायची. तर संध्याकाळर्यंत ती या लायब्ररी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत राहायची आणि घरी गेल्यावर सुद्धा काही वेळ ती अभ्यासाला बसायची अश्या या प्रयत्नातून आज खुशबू ने आपले ध्येय गाठून आपल्या घरच्यांचे तसेच तालुक्याचे नाव मोठे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या