अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये जोरदार पावसाने लावली हजेरी



अर्जुनी मोरगाव: नुकताच पावसाळा सुरू झाला असून दि.26 जून ला सकाळपासूनच अर्जुनी तालुक्यामध्ये पावसाला सुरूवात झाली होती पण पाऊस हा खूप जोरात आला असून जिकडे तिकडे पाऊस पडत असल्याने नद्या नाले तुडूंब भरली आहेत.

मात्र या पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मदत झाली असूूून पावसाच्या पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी धान पेरणी केली पण त्यांना पाण्याची आवश्यकता होती या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र चांगला दिलासा मिळाला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 50% शेतकऱ्यांची पेरणी आणि नांगरणी झाली आहे.

तालुक्यामध्ये जिकडे तिकडे पावसाचे प्रमाण वाढले असून पाऊस आज उद्या  कायम राहणार आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे अर्जुनी तालुक्यामध्ये मोरगाव, सुकळी खैरि, कुंभितोला, दाभाना, महागाव, नवेगाबांध, बोंडगाव देवी या गावामधे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या