अर्जुनी-मोरगाव : नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्गरम्य परिसरात मुक्तसंचार करणारा हत्तींचा कळपआता परतीच्या मार्गाला लागला आहे. मलकाझरी परिसरात बराच मुक्काम
झाल्यानंतर कळपाने इटियाडोह धरणाच्या दिशेने आगेकूच केली आहे.
झाशीनगर उपसा सिंचन योजनेच्या उंचवट्यावरून कळपाला हमखास बघता येते. ते सिंचन योजनेच्या वरच्या भागात तलाव परिसरात दिसून येतात. सूर्यदर्शनाच्या प्रहरी ते पाण्याकडे येतात व धरणाच्या पाण्यात बुडून मनमुराद आनंद घेत असल्याचे पर्यटनप्रेमी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष बघितले आहे.२४ हत्तींचा समूह असलेला हा कळप राष्ट्रीय उद्यानाच्या मलकाझरी जंगलात वास्तव्यास होता. पंधरवडा येथे घालवल्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून इटियाडोह धरण
परिसरात त्यांचा मुक्तसंचार सुरू आहे.हा परिसर जंगलव्याप्त असल्याने येथे या कळपाला सुरक्षितता वाटते. यामुळे येथे अधिक काळ हा कळप स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राणीडोहसारख्या परिसरात माणूस संचार करण्यासाठी घाबरतो, अशा ठिकाणी हत्तींचा कळप उतरलाआहे. गतवर्षी या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील खोळदा -बोळदा परिसरातून अर्जुनी-मोरगाव तालुक्यात प्रवेश केला होता.
सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये हत्तींबद्दल कुतूहल होते. मात् शेतपिकांचे होत असलेले नुकसान बघून लोकसुद्धा या कळपाला पळवून लावू लागले होते. या कळपाने बुटाई,
कालिमाती, सुकळी खैरी, दाभना, कवठा, देवलगावमार्गे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात प्रवेश केला होता.१२ ऑक्टोबर रोजी नागन डोह या आदिवासी वस्तीत कळपाने धुमाकूळ माजवला होता. तेथील ग्रामस्थांच्या झोपड्या उद्धवस्त केल्या होत्या.
३ ऑक्टोबर २०२२ रोजी कळपाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिडका येथील एका व्यक्तीचा या कळपाने बळी घेतला होता त्यामधे अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कालांतरानेका कळप निघून गेला होता.
पण २६ एप्रिल रोजी या कळपाचे इटीयादोह परिसरात पुनरागमन झाले.आणि आजही या कळपाचा या जंगलामध्ये प्रवास सुरू असून वास्तव्य आहे हे हत्तीचे वास्तव्य आता या भागात कायम राहील असे या भागातील लोकांचे म्हणणे आहे.
0 टिप्पण्या