
नवीन विहीर अनुदान योजना 2023 Vihir yojana 2023
नवीन विहीर अनुदान योजना 2023 ही राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांना या योजनेमुळे शेतीसाठी पाणी पुरवठाससाठी मदत होईल तसेच शेतीमध्ये पाणी कमी होणार नाही आणि शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतील यासाठी ही योजना सुरू केली आहे तरीपण याची सर्व माहिती या ब्लॉग मध्ये दिली आहे.
विहिरीसाठी ४ लाख अनुदान मिळणार
पूर्वी शेतकऱ्यांसाठीच्या मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन लाख रुपयांचे अनुदान मिळत होते. आता त्यामध्ये वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत प्रति विहीर एक लाख रुपयांची अनुदानात वाढ करण्यात आली असून आता चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नव्या विहिरींसाठी १ लाख अनुदान अधिकचे मिळणार आहे. जास्त शेतकऱ्यांनी मागील त्याला विहीर या योजनेअंतर्गत विहिरीचा लाभ घ्यावा.
नवीन विहीर योजनेचा उद्देश
1. राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने विहीर
2. अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
3. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आर्थिक पाठबळ देणे.
4. शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे.
5. शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे.
नवीन विहीर योजनेसाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड .
2. शेत जमिनीचा सातबारा व 8-अ
3. बँक पासबुक
4. एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
5. जातीचा दाखला
6. जर अर्जदार अपंग असेल तर त्याबाबत प्रमाणपत्र
7. पूर्व संमती पत्र
नवीन विहीर अनुदान योजनेच्या 2023 अटी
1. अर्जदार शेतकऱ्याकडे शेती योग्य भूमी असणे गरजेचे आहे.
2. शेतात विहीर असता कामा नये.
3. अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे. 4. अर्जदार शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
5. अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे व बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
6. अर्जदाराने यापूर्वी विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
7. लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
8. शेतात ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणपासून 500 मीटर पर्यंत विहीर नसावी
9. दोन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही.
10. अर्जदार व्यक्तीच्या 7/12 वर यापूर्वी विहिरीची नोंद नसवी.
11. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
12. जर अर्जदार व्यक्तीच्या जमिनीचे सह हिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
नवीन विहीर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
ग्रामपंचायत कार्यालयात, जिल्हा कार्यालयात, कृषी विभागात या योजनेचे अर्ज मिळतो. दिलेला अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल किंवा तुम्ही Maha DBT Portal वर सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अशा प्रकारे तुमची विहीर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
0 टिप्पण्या