
Photo Credit: Instagram photo
गोंदिया : संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्द्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून
त्या अंतर्ग (दि.२०) नवेगाव- नागझिरा अभयारण्यात वाघिणींचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणींच्या आगमनामुळे नवेगाव नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Photo Credit: Instagram photo
सडक अर्जुनी तालुक्यातील पिठेझरी गेट येथे वन विभागाच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखविली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.
जीपीएस कॉलर व व्हिएचएफच्या साहाय्याने नियंत्रण वाघांचे संवर्धन व स्थानांतर या उपक्रमाअंतर्गत एकूण ४-५ मादी वाघिणींना ब्रह्मपुरी भूभागातून नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात स्थानांतरीत करणे प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात २ मादी वाघिणींचे नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे आज स्थलांतर करण्यात आले आहे. दोन्ही वाघिणींना नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या गाभा भागात सोडण्यात आले.वाघिणींना सोडल्यानंतर सॅटेलाईट जीपीएस कॉलर व व्हिएच-एफच्या साहाय्याने दोन्ही वाघिणींचे चोवीस तास सक्रियपणे सनियंत्रण केले जाईल. संपूर्ण सनियंत्रणाचे कार्य हे कमांड आणि कंट्रोल रूम साकोली येथून नियंत्रित केले जाणार आहे.

Photo Credit: Instagram photo
महाराष्ट्रातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
नैसर्गिक अधिवासासाठी उत्तम ठिकाण करण विकास करणे व पाणवठे वाढविण्ण्यावर भर असून आज सोडण्यात आलेल्या वाघिणींच्या प्रजननातून वाघांची पुढील पिढी दर्जेदार निर्माण होण्यास साहाय्यभूत ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार सुनील मेंढे, अशोक नेते, आमदार विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता,मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक रंगनाथ नाईकडे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी प्रकल्प डॉ.रामगावकर, विशेष पोलिस हे उपस्थित होते.
नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात स्थित असून २०१३ मध्ये अधिसूचित करण्यात आलेला हा व्याघ्र प्रकल्प आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हा देशातील ४६ व राज्यातील ५ वा व्याघ्र प्रकल्प असून प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापना करण्यात आलेला आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे गाभा क्षेत्र ६५६.३६ चौरस कि.मी. आहे तसेच १२४१.२४ चौरस कि.मी. बफर क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
भविष्यात वाघांच्या संख्येत वाढ होऊन २० प्रौढ वाघ वास्तव्य करण्याची क्षमता उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा जयरामेगौडा आर. निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपसंचालक पवन जेफ, विभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील व राजेंद्र सदगीर यांनी सांगितले आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात प्रकल्पात पर्यटनाला चालना मिळू शकते. स्थानिकांना उपजीविकेच्या संधी निर्माण होतील. तसेच जास्त व्याघ्र संख्या असलेल्या ब्रह्मपुरी भूभागातील मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो.
ऑल इंडिया टायगर ईस्टिमेशन २०२२ च्या अहवालानुसार नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये किमान १९ प्रौढ वाघ असल्याचे नमूद आहे. सद्यस्थितीत व्याघ्र क्षेत्र हा कमी व्याघ्र घनतेचा भूभाग असून, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात २० प्रौढ वाघ वास्तव्य करण्याची क्षमता आहे अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या