असे झाले असल्यास आधार ची एखादी प्रत असेल तर ती वापरून नवीन त्याच क्रमांकाचे आधार पत्र काढण्यासाठी जवळील केंद्रास अर्जासह भेट द्या. (अर्जात नवीन क्रमांक आणि E-Mail नोंदवण्यास विसरू नका, सध्या काळाची गरज आहे ही.) आज या लेख मध्ये आधार कार्ड नवीन कसे काढायचे याविषयी जाणून घेऊया.
आपणास खुप ठिकाणी आधार पत्राची गरज भासते त्या वेळेस आपण त्याची सत्य प्रत जमा करतो, अश्या ज्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रत दिली आहे त्या ठिकाणी भेट द्या, विनंती करून पहा आधार ची प्रत मिळते का..! (Soft/ Hard Copy
त्याच्यानंतर UIDAI च्या संकेत स्थळावर जाऊन आधार पुनर्मुद्रण (Re-Print) करण्यासाठी ONLINE अर्ज करू शकता. या साठी तुम्हाला किमान आधार क्रमांक माहित असणे गरजेचे आहे. (हि सशुल्क सेवा आहे.) https://resident.uidai.gov.in/order-reprin
आधार पुनर्मुद्रणाची सध्य स्तिथी माहित करून घेण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या.https://resident.uidai.gov.in/check-reprint-statu
जर तुम्हाला आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक माहिती नसेल तर खालील लिंकला भेट द्या. https://resident.uidai.gov.in/lost-uidei
UIDAI चा 1947 हा निःशुल्क क्रमांक आहे यावर संपर्क साधा, किंवा Email: help@uidai.gov.in वर अर्ज करा
यावर आपले आधार कार्ड हरवल्याची तक्रार करा तुमच्या तक्रारीवर निवारण केले जाईल. आणि तुमचे जुन्या नंबरचे नवीन आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवले जाईल.
0 टिप्पण्या