Digital Gaavkari News
Salekasa Nagar Panchayat Election : गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा नगरपंचायत निवडणुकीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. दोन डिसेंबरला मतदान पार पडले, मात्र त्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी ईव्हीएम मशीनचे सील निवडणूक अधिकाऱ्यांनी तोडल्याचा गंभीर आरोप काँग्रेस आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात राजकीय ताप निर्माण झाला असून नागरिकांनीही तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
मतदानानंतर स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या १७ ईव्हीएम मशीनचे सील अचानक उघडल्याची माहिती समोर आली. निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांनी बॅटरी तपासण्यासाठी ईव्हीएम उघडल्याची कबुली दिली असली, तरी ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. देशात अशा प्रकारची घटना कधीच घडली नसल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.
या प्रकरणात आणखी एक वाद निर्माण झाला आहे. भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र बडोले यांच्या गाडीतूनच ईव्हीएमची वाहतूक करण्यात आल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. निवडणुकीत उतरणाऱ्या उमेदवाराच्या वाहनातून ईव्हीएम नेणं ही पद्धतच चुकीची असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. वाहनांसाठी टेंडर काढलं होतं का, याचीही चौकशीची मागणी होत आहे. मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना राजेंद्र बडोले यांनी प्रशासनाने सांगितल्यानेच वाहन उपलब्ध करून दिल्याचा दावा केला आहे.
याशिवाय निवडणूक निर्णय अधिकारी या भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नातेवाईक असल्याचा गंभीर आरोपही काँग्रेसने केला आहे. हितसंबंध असलेल्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात पाठवावे, अशी सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वं असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या आरोपांमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या सगळ्या गोंधळानंतर निवडणूक अधिकारी मोनिका कांबळे यांची उचल बांगडी करण्यात आली आहे. मात्र गोंदिया जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे ईव्हीएमचे सील खरंच तुटले की फक्त अॅड्रेस टॅग हटवण्यात आला, वाहनांचे टेंडर होते का, बॅटरी तपासणीची प्रक्रिया काय होती—या प्रश्नांची उत्तरं अद्यापही अनुत्तरितच आहेत.

दरम्यान, या प्रकरणामुळे सालेकसा परिसरात राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेससह सर्व पक्षांनी फेरमतदानाची जोरदार मागणी केली आहे. स्ट्रॉंग रूम बाहेर दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाविषयी सविस्तर तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

0 टिप्पण्या