साकोली : निवडणूक काळात शिवाजी वार्डात अवैध दारू तस्कर अटकेत, 900 देशी दारूच्या बाटल्या जप्त.


डिजिटल गावकरी न्यूज
Sakoli, Bhandara

साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे. सोमवारी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे साकोली पोलिसांनी शिवाजी वार्ड येथे छापा टाकत एकूण 900 देशी दारूच्या बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली मोटरसायकल असा ₹1 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीवरून कारवाई


सोमवार, 1 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 10 वाजता पोलिसांना अवैध दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून शिवाजी वार्ड, साकोली येथे छापा टाकला. यावेळी आरोपी अमित बोरकर याच्याकडून मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

निवडणूक काळातील सतर्कता वाढली

मंगळवार, 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 या वेळेत साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेची निवडणूक पार पडत आहे. निवडणूक काळात अवैध पैसे व दारू वितरण रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून त्याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

पोलिस निरीक्षकांकडून माहिती

ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांनी मंगळवार, 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पत्रकारांना याबाबत सविस्तर माहिती दिली.

पुढील तपास सुरू

आरोपीवर अवैध दारू साठा व वाहतूक प्रकरणी संबंधित गुन्हे नोंदवण्यात आले असून साकोली पोलीस अधिक तपास करीत आहेत. निवडणूक पारदर्शी व शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी परिसरात गस्ती वाढवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या