देवरी: आदिवासी विविध कार्यकारी संस्था अंभोरा तर्फे धान खरेदी केंद्र सुरू; आमदार संजय पुराम यांच्या हस्ते उद्घाटन.



डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर

देवरी (गोंदिया) – देवरी तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, अंभोरा यांच्या अंतर्गत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन गुरुवारी आमगाव–देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील या वर्षातील सर्वात पहिले हमीभाव धान खरेदी केंद्र म्हणून या केंद्राचे विशेष महत्त्व मानले जात आहे.

अंभोरा सहकारी संस्थेतर्फे सुरू होणाऱ्या या धान खरेदीबाबत शेतकऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती. अखेर आदिवासी विकास महामंडळाकडून अंतिम मंजुरी मिळताच केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना हमीभावाने धान विक्रीची महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

उद्घाटन सोहळ्यात नाशिक येथील संस्थेचे नव्याने निवडून आलेले संचालक भरतसिंग दुधनाग यांचा गावकऱ्यांकडून आणि सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करून गौरव करण्यात आला. पंचायत व कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने परिसरातील आदिवासी व इतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून हमीभाव मिळाल्यामुळे आर्थिक स्थैर्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या