गोंदिया जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची सहबळावर लढण्याची तयारी; सोनू कुथे म्हणाले – “कार्यकर्त्यांची इच्छा, ताकतीन उतरणार आहोत निवडणुकीत”.

गोंदिया जिल्ह्यात दोन नगरपरिषद व दोन नगरपंचायत निवडणुका लागल्या असून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सोनू पुटे यांनी सांगितले की पक्ष सहबळावर लढण्याच्या तयारीत आहे. उमेदवार 15 नोव्हेंबरपर्यंत जाहीर होणार.


डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर

गोंदिया : जिल्ह्यात दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायत निवडणुका लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचाराच्या रणनीतीपर्यंत जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सोनू कुथे यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, शिवसेना शिंदे गटाने या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे आणि सर्व कार्यकर्ते उत्साहात तयारी करत आहेत.

सोनू कुथे म्हणाले की, “गोंदिया जिल्ह्यातील तिरो आणि गोंदिया या दोन नगरपरिषद तसेच गोरेगाव नगरपंचायत निवडणुका आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आमच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आम्ही या सर्व निवडणुकांमध्ये स्वबळावर लढावे. कार्यकर्त्यांची ताकद आणि लोकांचा विश्वास आमच्यासोबत आहे. त्यामुळे आम्ही सर्व शक्तीनिशी तयारी करत आहोत.”

ते पुढे म्हणाले की, नगराध्यक्ष उमेदवार आम्ही 15 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करू. गोंदिया विधानसभेने दोन वेळा शिवसेनेचा आमदार दिला आहे, त्यामुळे हा भाग शिवसेनेसाठी पोषक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात झालेल्या विकासकामांमुळे लोकांचा विश्वास वाढला आहे आणि याचा फायदा आगामी निवडणुकीत नक्कीच होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर की राष्ट्रवादी काँग्रेससोबत काही चर्चा सुरू आहे का, यावर सोनू कुथे म्हणाले की, “आमचा मित्र पक्षांसोबतचा ऑप्शन ओपन आहे. जरी कुठे चर्चा करण्याची गरज भासली तर आम्हाला त्यात काहीच हरकत नाही. मात्र सध्या आमची तयारी पूर्णपणे स्वबळावर लढण्याची आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

गोंदिया जिल्ह्यातील या चार निवडणुका स्थानिक राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. गोंदिया आणि तिरो नगरपरिषद तसेच गोरेगाव नगरपंचायत या ठिकाणी मतदारांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांची तयारी सुरू केली असून, शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर लढण्याचा नारा दिल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवा रंग भरला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र सध्या तरी शिवसेना शिंदे गटाने दाखवलेला आत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता आगामी निवडणुकीत तीव्र सामना रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या