स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; पात्र लाभार्थ्यांना 12 हजार रुपयांचे अनुदान.

Swachh Bharat Mission अंतर्गत Toilet Yojana साठी online अर्ज करा आणि ₹12,000 चे सरकारी अनुदान मिळवा. SBM.gov.in वर Citizen Registration, Login आणि New Application कसा करायचा हे येथे सोप्या भाषेत जाणून घ्या.


Toilet Scheme Maharashtra 2025 : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील गरिब आणि शौचालयविहीन कुटुंबांसाठी शौचालय बांधणीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून 12,000 रुपयांचे अनुदान दिले जाते. या योजनेत लाभ घ्यायचा असल्यास नागरिकांनी अधिकृत सरकारी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी असून नागरिक घरी बसून अर्ज करू शकतात.

ऑनलाईन नोंदणी कशी कराल?

स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत वेबसाइट sbm.gov.in वर जाऊन सर्वप्रथम ‘Citizen Registration’ हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून OTP द्वारे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते.
नोंदणी झाल्यानंतर आधारकार्डावरील नाव, पत्ता, लिंग यासह आवश्यक माहिती भरून खाते तयार केले जाते.

लॉगिन करून अर्ज भरण्याची प्रक्रिया

नोंदणी पूर्ण झाल्यावर पुन्हा वेबसाइटवर लॉगिन करून ‘New Application’ हा पर्याय निवडावा लागतो. अर्ज भरताना खालील महत्त्वाची माहिती द्यावी लागते:

राज्य : महाराष्ट्र

जिल्हा, तालुका/ब्लॉक, ग्रामपंचायत, गाव

अर्जदाराचे आधारकार्डवरील पूर्ण नाव

आधार क्रमांक व त्याचे OTP व्हेरिफिकेशन

वडिलांचे/पतीचे नाव

कुटुंबाची श्रेणी : APL / BPL / केशरी / पिवळा कार्ड

उपश्रेणी : SC / ST / PH / Small Farmer इत्यादी
बँक खाते क्रमांक, IFSC कोड


बँक पासबुकची स्कॅन केलेली प्रत (JPG/PNG/PDF फॉर्मॅट)

सगळी माहिती भरल्यानंतर ‘Apply’ वर क्लिक करताच अर्ज यशस्वीरीत्या सबमिट होतो आणि सिस्टम एक अर्ज क्रमांक (Reference Number) देते.

अर्जाची पुढील प्रक्रिया

हा अर्ज थेट संबंधित ग्रामपंचायतीमध्ये पाठवला जातो. त्यानंतर ग्रामसेवक लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन तपासणी करतो.
घरात शौचालय नसल्याची खात्री झाल्यावर ‘Scrutiny Done’ असा अर्जाचा स्टेटस दिसू लागतो. त्यानंतर ग्रामसेवक बांधकामाची प्रगती तपासत टप्प्याटप्प्यांचे फोटो अपलोड करतो.

बांधकाम पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याच्या बँक खात्यात 12,000 रुपयांचे अनुदान जमा केले जाते.

महत्वाचे

घरात आधीच शौचालय असल्यास अर्ज करणे व्यर्थ आहे; लाभ मिळणार नाही.

ग्रामसेवकास अर्ज क्रमांक कळवून घरची पडताळणी लवकर करून घेता येते.

अर्जाची स्थिती (Status) वेबसाइटवरील ‘Track Application’ मध्ये सतत पाहता येते.

https://sbm.gov.in/SBM_DBT/Secure/DBT/DBT_Registration.aspx

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामीण भागात स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेला महत्त्व मिळावे म्हणून ही योजना राबवली जात असून, पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या