Talathi Bharti 2025 New Update
नमस्कार मंडळी राज्यात गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकाऱ्यांची (तलाठी) १७०० पदे अखेर भरली जाणार आहेत. त्यासाठी शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हि तलाठी भरती प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरु होणार असल्याचे दिसत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली असून, भरतीसाठीची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे.
तलाठी भरती होण्याची शक्यता
सन २०१८-२०१९ मध्ये तलाठी भरती झाली. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षे, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीमुळे तसेच न्यायालयीन प्रकरणामुळे भरती रखडली होती. २०२३-२०२४ मध्ये भरती पुन्हा सुरू झाली. सरळसेवेने २०८ तसेच अनुकंपाच्या माध्यमातून अंदाजे २८ पदे भरली. त्यानंतर अद्यापही भरती घेण्यात आली नाही. मात्र, नवीन आकृतीबंधानुसार तलाठी भरती होण्याची शक्यता आहे.
प्रवर्गनिहाय संख्या
▪️सर्वसाधारण १६७६
▪️महिला १४७३
▪️खेळाडू २१६
▪️माजी सैनिक ७०५
▪️प्रकल्पग्रस्त २१३
▪️भूकंपग्रस्त ६३
▪️पवीधर अंशकालीन ४४७
जिल्हानिहाय पदांची संख्या
▪️सेतू केंद्रामार्फत अर्ज भरण्याकरीता मार्गदर्शन
▪️पेसा क्षेत्रांची यादी
▪️दिव्यांग- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
▪️अनाथ- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
उमेदवारांसाठी संधी आणि आव्हान
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे, पण काही निराशाजनक बाबीही समोर आल्या आहेत
➡️ महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणी सेवेत करण्याची मागणी प्रलंबित आहे.
➡️ त्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी मंजूर करण्याची मागणी शासनाकडे आहे.
➡️ महसूलमंत्र्यांनी या प्रश्नावर मंत्रालयात तातडीची बैठक घेतली.
बैठकीतील प्रमुख मुद्दे
मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली
1️⃣ महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची तरतूद नसल्याचे स्पष्ट झाले.
2️⃣ मात्र, त्यांचा अनुभव लक्षात घेऊन तलाठी भरतीत काही जागा राखीव ठेवण्याचा विचार सुरु आहे.
3️⃣ तसेच, सेवकांच्या अनुभवाला अधिक गुण देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
4️⃣ महसूलमंत्र्यांनी महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
तलाठी भरती जाहिरात लवकरच जाहीर होणार असून, भरतीची प्रक्रिया डिसेंबर 2025 पूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे.

0 टिप्पण्या