Rain Update maharstra: विदर्भ महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज.


डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर

Rain Update Vidarbha: नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांसाठी महत्वाची हवामान बातमी! राज्यात कालपासून ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाचा प्रभाव दिसून येईल.

आजचा हवामान अंदाज (24 ऑक्टोबर 2025)

हवामान विभागाने आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

उद्याचा हवामान अंदाज (25 ऑक्टोबर 2025)

उद्या संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता आहे. या काळात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रविवारचा हवामान अंदाज (26 ऑक्टोबर 2025)

रविवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.




सोमवारचा हवामान अंदाज (27 ऑक्टोबर 2025)




सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. तरीही विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि गोंदिया , भंडारा, गडचिरोली तसेच मराठवाड्यातील बीड, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे आणि कोकणातील रायगड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे.

शेतकरी मित्रांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी. पावसामुळे पिकांवर होणारा परिणाम आणि पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत सतर्क राहावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या