Digital Gawkari News
Durgaprasad Gharatkar
Ladki bahin KYC Last Date : बहीण योजनेच्या अंतर्गत निकषात न बसणाऱ्या महिला सुद्धा योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं. त्यानंतर सरकारने ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. या संदर्भात आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचं आवाहन सर्व लाडक्या बहिणींना केलं आहे.
योजना: लाडकी बहीण योजनाe-KYC अनिवार्य
अधिकृत संकेतस्थळ https://ladakibahin.maharashtra.gov.in
उद्देश: योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता ई-केवायसी अनिवार्य.
e - KYC ची सुरवात: 18 सप्टेंबर 2025 पासून सुरू
e - KYC ची अंतिम तारीख:18 नोव्हेंबर 2025 पर्यंत
ई-केवायसीची अंतिम मुदत काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे.
ज्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही त्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पुर्ण करावी.
ई-केवायसी न करणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे नाही?
सरकारने ई-केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत ही ई-केवायसीची शेवटची तारीख* आहे. त्यामुळे या मुदतीपर्यंत लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवण्यात येणार नाही. मात्र, मुदत संपल्यानंतरही ई-केवायसी केले नाही तर मात्र, अशा लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला जाण्याची शक्यता आहे.

0 टिप्पण्या