गोंदिया : नुकत्याच नेमणूक झालेल्या गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज प्रथमच जिल्ह्याच्या नियोजनाचा आणि दोन दिवसांपूर्वी (२७ ऑक्टोबर) झालेल्या मुसळधार अतिवृष्टीच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना नाईक यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत गंभीर भूमिका घेतली. सर्व तालुक्यांत नुकसान असले तरी गोंदिया तालुक्यातील नुकसान सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे
बैठकीत घेतली पूर्ण माहिती, चार दिवसांत सर्वे पूर्ण
पालकमंत्री नाईक यांनी सांगितले दोन दिवसापूर्वी फार जास्त अतिवृष्टी झालेली आहे आपल्या गोंदिया जिल्ह्यात." या बेमौसम पावसामुळे कापणीस तयार असलेल्या धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बैठकीत जिल्हाधिकारी प्रजीत नायर तसेच महसूल, कृषी, सिंचन विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याची स्थिती मांडली. गोंदिया तालुका, तिरोडा, सडगाव सह इतर भागांत पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले.
नाईक यांनी स्पष्ट सांगितले "आजपासून चार दिवसांत पूर्ण सर्वे होणार आहे. सर्वे आल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होईल. त्याच्यानंतर आपण समोरची कारवाई करू."या सर्व्हादरम्यान प्रत्येक शेतकऱ्याचे नुकसान अचूक नोंदवण्याचे आणि तत्काळ भरपाई प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.आणि कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
गोंदिया तालुक्यात धान पिकांना धक्का जिल्ह्यातील आठही तालुक्यांत अतिवृष्टीचा फटका बसला असला तरी गोंदिया तालुक्यातील नुकसान अत्यंत गंभीर आहे. येथे शेकडो हेक्टरवर कापलेले धान गळून पडले, तर अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा प्रशासनाने कालच अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली असून, गोंदिया तालुका यात समाविष्ट आहे. यंदाच्या खरीप हंगामात धान हे प्रमुख पिक असल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट कोसळले आहे.
नव्या पालकमंत्र्यांची पहिलीच पावलं; विकास निधीवरही चर्चा.
१७ ऑक्टोबरला बाबासाहेब पाटील यांच्या जागी इंद्रनील नाईक यांची नेमणूक झाल्यानंतर ही त्यांची **जिल्ह्याची पहिलीच मोठी बैठक होती. यावेळी जिल्हा विकास निधी चीही आढावा चर्चा झाली. नाईक यांनी म्हटले हा निधी निर्धारित वेळेत खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करावीत. यामुळे स्थानिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शासनाची गांभीर्यपूर्ण भूमिका; शेतकऱ्यांना लवकरच दिलासा.
महाराष्ट्र शासनाने यंदा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी सरसकट मंजुरी दिलेली आहे. गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबरपासून सतत पावसाने शेतकऱ्यांना त्रास दिला असून, आता डिसेंबरपूर्वीच अनुदान खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री नाईक यांनी शेतकऱ्यांना "काळजी करू नका शासन तुमच्या सोबत आहे" असे आश्वासन दिले.
या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने सर्वे टीम्सना तात्काळ रवाना केले असून, चार दिवसांत अहवाल सादर करण्याचे आव्हान दिले आहे. शेतकऱ्यांमध्येून पालकमंत्र्यांच्या सक्रियतेमुळे समाधान व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या