अतितीव्र मोंथा चक्रीवादळ आज रात्री विदर्भात धडकणार महाराष्ट्रात आज-उद्या जोरदार पावसाचा धोका | हवामान अंदाज लाइव्ह अपडेट.


डिजिटल गावकरी न्यूज
दुर्गाप्रसाद घरतकर

Montha weather update maharstra : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोथाr चक्रीवादळाने आज सकाळी अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर केले आहे. हे चक्रीवादळ आज रात्री आंध्रप्रदेशातील काकीनाडा भागात किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. मागील सहा तासांपासून ते १२ किलोमीटर प्रतितास वेगाने उत्तर वायव्य दिशेने वाटचाल करत आहे. सध्या हे चक्रीवादळ मछलीपट्टनम पासून दक्षिण अग्नेयला १६० किलोमीटर, विशाखापट्टनम पासून दक्षिण वायव्यला ३२० किलोमीटर आणि काकीनाड्यापासून २४० किलोमीटर अंतरावर आहे. लँडफॉलच्या वेळी ९० ते १०० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, छत्तीसगड आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे. सोमवारपासून आंध्रप्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे तर तेलंगणाच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली आहे. छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात उद्या पावसाचा जोर अधिक राहील. कर्नाटकच्या किनारी आणि उत्तर भागात, तमिळनाडू आणि केरळमध्येही काही ठिकाणी दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात आज आणि उद्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक राहील. आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ठिकठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळेही राज्यातील हवामानावर परिणाम होत आहे. या दोन्ही प्रणालींच्या संयुक्त प्रभावाने महाराष्ट्रात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. अशाच हवामान अपडेटसाठी डिजिटल गावकरी न्यूज वेबसाइटला सबस्क्राईब करायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या