बोंडराणी शिवारात गळा चिरून युवतीची निर्घृण हत्या; गोंदिया जिल्ह्यात खळबळ.


Digital Gavkari News

गोंदिया: नमस्कार मंडळी गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी शिवारात एका वीस वर्षीय युवतीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत युवती कोबळे कुटुंबातील असून ती मासेमारी आणि शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलगी होती. प्राथमिक माहितीनुसार, या युवतीचे गावातीलच दुसऱ्या समाजातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. या संबंधाला दोन्ही कुटुंबांचा तीव्र विरोध होता. विरोधाच्या पार्श्वभूमीवर हे दोघे काही महिन्यांपूर्वी गावातून पळून गेले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी ते पुन्हा गावात परतले. कुटुंबीयांमध्ये झालेल्या चर्चेनंतर युवती पुन्हा वडिलांच्या घरी परतली होती.

गुरुवारी सकाळी बोंडराणी शिवारात युवतीचा मृतदेह आढळून आला. गळा चिरलेली अवस्था पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून, हत्या प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या तणावामुळे झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या दोन्ही कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे.

या घटनेनंतर परिसरात आंतरजातीय विवाहांवरील सामाजिक दबाव आणि विरोधाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. समाजातील काही घटक आजही जातीय बंधनांच्या चौकटीत विचार करतात, यावरून समाजात मोठी चर्चा सुरु झाली आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, काही संशयितांची नावे समोर आली असून तपास जलदगतीने सुरु आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलेतील रहिवाशांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. "प्रेमसंबंधांवरून जीव घेण्याइतका अतिरेक होत आहे, हे समाजासाठी लज्जास्पद आहे," अशी प्रतिक्रिया स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या