नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2025 | 7 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाचा जीआर जारी.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2025 चा 7 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याचा GR शासनाने शेयर केला आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 

मुंबई | 3 सप्टेंबर 2025
नमस्कार मंडळी शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2025 अंतर्गत सातव्या हप्त्यासाठी महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून त्याबाबतचा शासन निर्णय (जीआर) अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

पीएम किसान + नमो शेतकरी महासन्मान = वार्षिक 12 हजार रुपये

शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेतून वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. त्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आणखी 6,000 रुपये देण्यात येतात. म्हणजे शेतकऱ्यांना एकूण वार्षिक 12,000 रुपये मिळतात.

पीएम किसान सन्मान निधी : वार्षिक ₹6,000 (₹2,000 चे 3 हप्ते)

नमो शेतकरी महासन्मान निधी : वार्षिक ₹6,000 (₹2,000 चे 3 हप्ते)

याआधी 2 ऑगस्ट 2025 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. त्यानंतर शेतकरी सातव्या हप्त्याची वाट पाहत होते.

7 वा हप्ता होणार बँकेत जमा


शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज (3 सप्टेंबर 2025) निर्गमित झालेल्या जीआरनुसार, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीसाठी सातव्या हप्त्याचा लाभ देण्यासाठी 1932.72 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हा निधी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा डेटा वापरून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केला जाणार आहे.

याआधी या योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते. मात्र सातवा हप्ता उशीराने मिळाल्याने शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. शासनाने आता निधी मंजूर केल्याने हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.

जर हप्ता मिळाला नाही तर काय करावे?

जर एखाद्या शेतकऱ्याला सातवा हप्ता मिळाला नसेल किंवा स्टेटस तपासायचे असेल तर शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले स्टेटस तपासू शकतात.

किती हप्ते मिळाले आहेत

कोणता हप्ता बाकी आहे

काही अडचण असल्यास ती माहिती

ही संपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी मिळून वर्षाला 12 हजार रुपयांचा लाभ पोहोचतो. सातव्या हप्त्याचा निधी आता मंजूर झाल्याने शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकरच 2,000 रुपये जमा होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या