Vote Chori 2025 : राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; "मतदान प्रक्रिया चोरली गेली" असा दावा.

Rahul gandhi vote Chori press confrence 

नवी दिल्ली : नमस्कार मंडळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर थेट आणि गंभीर आरोप करत भारतीय लोकशाहीत खळबळ माजवली आहे. पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी दावा केला की देशातील मतदान प्रक्रिया "चोरली" गेली असून मोठ्या प्रमाणावर इलेक्टोरल फ्रॉड घडला आहे. त्यांनी याला "अनुबॉम" असे नाव दिले आहे.

राहुल गांधींचा आरोप आहे की कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात मतदार यादीमध्ये एक लाख 250 फेक मतदारांची भर करण्यात आली. यात 11,965 डुप्लिकेट मतदार, 4,092 अवैध पत्ते, 10,452 एका पत्त्यावर मोठ्या प्रमाणात मतदार, 4,132 अवैध फोटो, आणि 33,692 फॉर्म-6 चा गैरवापर झाल्याचे त्यांनी कागदपत्रांच्या आधारे मांडले.

त्यांनी उदाहरण देताना सांगितले की

गुरकीरत सिंग डांग हे नाव व पत्ता सारखा असूनही चार वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नोंद आहे.

आदित्य श्रीवास्तव नावाचा मतदार उत्तर प्रदेश व महाराष्ट्र दोन्ही राज्यांत नोंदणीकृत आहे.

एका घर क्रमांक 35 मध्ये 80 मतदार, तर घर क्रमांक 791 मध्ये 46 मतदार नोंदले आहेत.

राहुल गांधींचा आरोप आहे की काही मतदारांनी तीन ते चार वेळा मतदान केले. तसेच काहींचे फोटोच स्पष्ट दिसत नाहीत किंवा झूम करून घेतलेले आहेत, ज्यामुळे ओळख पटवणे अशक्य आहे.

महाराष्ट्रातील निवडणुकांवरही आरोप

राहुल गांधी यांनी याआधी महाराष्ट्रात एक कोटी फेक मतदार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या मते, यामुळेच विधानसभा निवडणुकीत बीजेपी व सहयोगी पक्षांना विजय मिळवणे सोपे झाले. त्यांनी निवडणूक आयोगावर बीजेपीला फेवर केल्याचा आणि शेवटच्या क्षणी मतदार यादीत बदल केल्याचा आरोप केला.

निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर

निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप "बेसलेस व निराधार" असल्याचे सांगितले. आयोगाने राहुल गांधींना आव्हान दिले आहे की –

आरोपांचे पुरावे शपथपत्रासह सादर करावेत, किंवा

चुकीची माहिती दिल्याबद्दल सार्वजनिक माफी मागावी.

उत्तर प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी आदित्य श्रीवास्तव नावाचा मतदार त्यांच्या राज्यात नोंदणीकृत नसल्याचे स्पष्ट केले.

लोकशाहीवरील परिणाम

भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीत निवडणूक आयोगावर अविश्वास निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. जर राहुल गांधींचे आरोप खरे ठरले, तर ही केवळ भ्रष्टाचाराची नव्हे तर 140 कोटी भारतीय मतदारांशी गद्दारी असल्याची टीका होत आहे. तर, आरोप खोटे असल्यास अशा संस्थेची प्रतिष्ठा धुळीस मिळवणे हे बेजबाबदार वर्तन असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सखोल चौकशीची मागणी

या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी विविध पातळ्यांवर होत आहे. कारण लोकशाही ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून विश्वास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या स्तंभांवर उभी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या