TCS च्या 12,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, IT Sector मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी बेरोजगार होणार .

Tata consultuncy lose Job 

Digital Gaavkari news 
✍️दुर्गाप्रसाद घरतकर 

पुणे: 12,000 TCS employees will lose their jobs Update: नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कडून आलेली एक मोठी आणि धक्कादायक बातमी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कंपनीने आपल्या वर्क फोर्समध्ये तब्बल 2% कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजेच जवळपास 12,000 कर्मचारी या आर्थिक वर्षात आपली नोकरी गमावणार आहेत. विशेष बाब म्हणजे, या कर्मचाऱ्यांमध्ये मुख्यत्वे मिडल आणि सीनियर मॅनेजमेंट लेव्हलवरील, 8 ते 15 वर्षे अनुभव असलेले कर्मचारी असणार आहेत.

हिंजवडीसारख्या आयटी हबमध्ये अजित पवार यांच्या दौऱ्यांची चर्चा सुरु असताना, आणि राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी अनेकांच्या चिंता वाढवणारी ठरते आहे. दोन वर्षांपूर्वी आयटी क्षेत्रामध्ये ट्रिशन रेट प्रचंड वाढला होता, म्हणजे अनेक कर्मचारी स्वतःहून नोकरी सोडून जात होते. पण आता, उलट परिस्थिती निर्माण झाली आहे - कंपन्याच मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.

कोणत्या नोकऱ्या गायब होत आहेत?

मॅन्युअल टेस्टिंग

डेटा एंट्री

लो-कोड डेव्हलपमेंट

यासारख्या पारंपरिक नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हळूहळू कालबाह्य होत आहेत. कंपन्यांनी मागील काळात जी ओव्हरहायरिंग केली होती, तीच आता त्यांच्यासाठी बोजा ठरते आहे.

मोठ्यांबरोबर छोट्या कंपन्यांनाही फटका

ही स्थिती फक्त TCS, Infosys, Wipro किंवा Accenture यांच्यासारख्या मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित नाही. लहान आणि मध्यम आयटी कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणात याचा फटका बसतो आहे. कारण ग्राहकांची मागणी आता बदलली आहे - कमी किमतीत उच्च दर्जाच्या, AI-सक्षम सेवा हवी आहेत. अशा स्पर्धेत लहान कंपन्या टिकू शकत नाहीत.

नोकरकपातीमागील मुख्य कारणं:

1. AI आणि ऑटोमेशनचा प्रभाव:
कोड जनरेशन, चॅटबॉट्स, ऑटो टेस्टिंगमुळे एकाच कामासाठी आधी लागणाऱ्या 10 कर्मचाऱ्यांऐवजी आता 2-3 पुरेसे होतात.

2. ओव्हरहायरींग (2020-2022):
कोरोना काळात अचानक वाढलेल्या डिजिटायझेशनमुळे भरमसाठ भरती झाली. पण आता मागणी घटल्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी प्रोजेक्टच उपलब्ध नाहीत.

3. जागतिक मंदी आणि क्लायंट खर्चात घट:
अमेरिकन आणि युरोपीय ग्राहकांनी आयटी प्रकल्पांचे बजेट कमी केले आहे. यामुळे बिझनेस कमी आणि प्रेशर अधिक.

4. स्किल मॅचिंग अभाव:
पारंपरिक स्किल्स असलेले कर्मचारी आता AI, Cloud, Data Science यासारख्या नवीन प्रोजेक्ट्समध्ये बसत नाहीत.

5. लीन स्ट्रक्चर ट्रेंड:
कमी लोक, पण अत्यंत कुशल आणि टेक-सेव्ही कर्मचारी ठेवायचा ट्रेंड आहे.

याचे संभाव्य परिणाम काय होत आहेत

वैयक्तिक पातळीवर:

गृहकर्ज, वाहन कर्ज, वैद्यकीय खर्च, मुलांचे शिक्षण यांसाठी हप्ते भरणे कठीण होऊ शकते.

मानसिक आरोग्यावर परिणाम, आत्मविश्वास घट, भविष्याची चिंता.

समाज आणि बाजारावर परिणाम:

IT कर्मचारी हा सर्वाधिक खर्च करणारा वर्ग आहे. त्यांच्या खर्चातील घटमुळे:

रियल इस्टेट, ऑटोमोबाईल, एज्युकेशन, रिटेल क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम.

गावाकडे परतण्याचे प्रमाण वाढेल, त्यामुळे शहरी भाडे बाजारात घसरण होईल.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम:

IT क्षेत्राचा GDP मध्ये 7-8% वाटा आहे.

बेरोजगारीमुळे EMI आणि क्रेडिट कार्ड हप्ते डिफॉल्ट होण्याची शक्यता.

बँकिंग क्षेत्रावर दबाव.

सरकारवर स्किल डेव्हलपमेंट आणि रोजगार योजनांबाबतचा ताण वाढणार.

काही दिलासा देणाऱ्या बाबी

TCS ने सांगितले आहे की त्यांनी सर्व ऑफर केलेल्या जॉब्स ऑनर केल्या आहेत.

नवीन भरती सुरुच राहणार आहे, विशेषतः AI, Cloud, Data Science क्षेत्रांमध्ये.म्हणजेच, जे अपडेट आहेत, ते टिकणारच आहेत.

आयटी क्षेत्र सध्या ट्रान्झिशन फेजमध्ये आहे. एकेकाळी हे क्षेत्र लाखोंच्या स्वप्नांची पूर्तता करणारे होते. आता मात्र तेच क्षेत्र मोठं प्रश्नचिन्ह उभं करत आहे. विशेषतः मोठ्या कंपन्याही जेव्हा हजारोंच्या संख्येने कर्मचारी कमी करतात, तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की ही फक्त सुरुवात आहे. या काळात केवळ टिकून राहणं पुरेसं नाही, तर 'अपडेट' राहणं गरजेचं आहे.

जर तुम्ही या लेखाशी सहमत असाल, तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर शेअर करा आणि आमच्या वेबसाइटला फॉलो करायला विसरू नका.

धन्यवाद!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या