Monsoon Rain: कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता .

Monsoon Rain: कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर क


Digital Gavkari news

मुंबई: नमस्कार मंडळी राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. काही भागांत मुसळधार सरी कोसळत आहेत तर काही भागांत ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरींचा अनुभव नागरिक घेत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यातील धाराशी, लातूर, परभणी आणि नांदेड तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर म्हणजे कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिजोरदार पाऊस पडू शकतो. या भागांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

राज्यातील इतर भागांतही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या घाटमाथ्यावरील भागांत जोरदार पावसाचा धोका असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत देखील काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

शनिवारी कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याउलट मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागांत उघडीप राहण्याची शक्यता आहे.

रविवार आणि सोमवारलाही कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून राज्याच्या इतर भागांत मात्र हवामान तुलनेने कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या