मुंबई | ९ ऑगस्ट २०२५
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे, मात्र सर्वदूर जोरदार पावसाची हजेरी अद्याप लागलेली नाही. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही भागांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भात पावसाचा जोर
आज (शनिवार) भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तर अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात पावसाची शक्यता
जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तर इतर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकण
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकणात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उद्याचा (रविवार) हवामान अंदाज
पूर्व विदर्भ: वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया – विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
मराठवाडा: बीड, धाराशी, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली – हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता.
मध्य महाराष्ट्र: कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, पुणे, अहिल्यानगर – विजा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस.
सोमवारी पावसाचा अंदाज
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस.
पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस.
दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलका पाऊस.
हवामान विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, पुढील काही दिवसांच्या पावसाचा विचार करून पिकांचे संरक्षण, निचरा आणि लागवड कामे नियोजनपूर्वक करावीत.

0 टिप्पण्या