जागतिक आदिवासी दिवस – आपल्या आदिवासी वारशाचा अभिमान.


जागतिक आदिवासी दिवस – आपल्या वारशाचा अभिमान

लेखक – दुर्गाप्रसाद घरतकर

नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी!
दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस जगभरात "जागतिक आदिवासी दिवस" म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि त्यांचा आपल्या देशाच्या व जगाच्या घडणीतला महत्त्वाचा वाटा याची जाणीव करून देणारा दिवस आहे

हा दिवस कधी आणि का साजरा होतो?

१९९४ साली संयुक्त राष्ट्र संघाने (UNO) हा दिवस जाहीर केला. १९८२ मध्ये जेनेव्हा येथे आदिवासी लोकांच्या हक्कांवर पहिली आंतरराष्ट्रीय बैठक झाली होती, त्या दिवसाच्या स्मरणार्थ ९ ऑगस्ट निवडण्यात आला.

जागतिक आदिवासी या दिवसाचं महत्त्व

आदिवासी लोकांच्या संस्कृती आणि परंपरेचं जतन

त्यांच्या भाषा, नृत्य, गाणी, कला यांचं जतन

शिक्षण, आरोग्य, रोजगार यामध्ये त्यांना न्याय मिळावा

त्यांच्या जमिनी व नैसर्गिक संसाधनांवरचा हक्क कायम ठेवणं

समाजात आदिवासी लोकांविषयी आदर आणि जागरूकता निर्माण करणं

भारतातील आदिवासी समाज

भारतामध्ये सुमारे १० कोटींहून अधिक आदिवासी लोक राहतात. महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणात त्यांची वस्ती आहे. महाराष्ट्रात गोंड, वारली, कोळी, भिल्ल, कातकरी, मदिया, कोरकू यांसारख्या जमाती प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या सण, नृत्य, चित्रकला आणि लोकगीतांमधून आपल्याला निसर्गाशी जोडलेली जीवनशैली दिसते.

या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा प्रदर्शन, आदिवासी खाद्यपदार्थांचे मेळे आणि त्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवलं जातं.

शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायतींमध्ये आदिवासींच्या योगदानावर भाषणं, चर्चासत्रं घेतली जातात.

जागतिक आदिवासी दिवस हा फक्त एक दिवस नसून आदिवासी समाजाच्या अभिमान, हक्क आणि अस्तित्वाचा सन्मान आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्यांचा वारसा जपायला आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायला हवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या