![]() |
| Gadchiroli student accident |
गडचिरोली : जिल्ह्यातील काटली गावात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा युवकांना भरधाव ट्रकने चिरडल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी आहेत.
काय घडलं नेमकं?
गडचिरोलीपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या काटली गावात सकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सहा युवकांना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी जबरदस्त होती की, दोन विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर चार जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचाऱादरम्यान अजून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांचा आक्रोश; चक्काजाम आंदोलन
या घटनेनंतर संपूर्ण काटली गावात शोककळा पसरली आहे. संतप्त गावकऱ्यांनी सकाळपासूनच चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. ट्रक चालकावर आणि संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पोलीस प्रशासनाकडून कठोर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गावात सतत पेट्रोलिंग सुरू आहे.
चालक 'मध्यधुंद' अवस्थेत होता?
प्राथमिक माहितीवरून असं समजतंय की, ट्रक चालक हा मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्यामुळेच त्याच्याकडून गाडीवरील ताबा सुटून हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांची स्पष्ट मागणी आहे की, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी.
प्रशासन व शासनाकडे मागण्या
गावकऱ्यांनी खालील मागण्या केल्या आहेत:
संबंधित चालकावर तातडीने गुन्हा दाखल करावा
अपघाताची संपूर्ण चौकशी करावी
कंटेनर मालक व कंपनीवर कारवाई करावी
मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी
गावाजवळून जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणावं
गावात शोकसागर
या घटनेमुळे काटली गावात शोकसागर पसरला आहे. मृत्यू पावलेल्या युवकांचे वय १७ ते २२ वर्षांच्या दरम्यान होते. ते सर्व विद्यार्थी असून, भविष्यातील स्वप्नं उराशी बाळगून व्यायामासाठी घराबाहेर पडले होते. त्यांचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं.
अपघाताची चौकशी सुरू
गडचिरोली जिल्हा प्रशासनाने या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
ही घटना केवळ अपघात नाही, तर सिस्टिम फेल्युअरचं उदाहरण आहे. मध्यधुंद चालक, भरधाव वेग, आणि रस्त्यावरील निष्काळजीपणा यामुळे अजून किती निष्पाप जीव जातील? नागरिकांचा रोष योग्य असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे.

0 टिप्पण्या