खुशखबर बांधकाम कामगार भांडी वाटप योजना सुरू झाली आहे 🎁 Bandhkam kamgar Kitchen Set Yojana 2025.

बांधकाम कामगारांसाठी खुशखबर : गृहपयोगी वस्तू संच वाटपासाठी ऑनलाइन अर्ज सुरू

नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेले गृहपयोगी वस्तू संच वाटप अखेर पुन्हा सुरू झालेले आहे. महाराष्ट्र इमारत व अन्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (MBOCWWB) तर्फे हा महत्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी आवश्यक भांडी व वस्तूंचा संच मोफत दिला जातो. अनेक दिवस कामगारांची प्रतीक्षा अखेर संपली असून आता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

गृहपयोगी वस्तू संच वाटप काय आहे?

बांधकाम कामगारांना शासनामार्फत विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जातो. त्यामध्ये गृहपयोगी वस्तू संच योजना ही महत्वाची योजना आहे. या योजनेतून कामगार कुटुंबांना स्वयंपाकघरासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू जसे की – भांडी, ताट, डबे, पातेले इत्यादी वस्तूंचा संच मोफत वाटप केला जातो.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – मोबाईलवरूनच सोप्या पद्धतीने

सर्वप्रथम बांधकाम कामगारांना अधिकृत वेबसाईटला (MBOCWWB) भेट द्यावी लागेल.

वेबसाईटवर “गृहपयोगी वस्तू संच अर्ज” हा पर्याय निवडावा.

अर्ज करण्यासाठी कामगारांनी आपला नोंदणी क्रमांक (Registration Number) टाकणे आवश्यक आहे.

नोंदणीवेळी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP (वन-टाईम पासवर्ड) येईल.

OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती स्क्रीनवर दिसेल.

नोंदणी क्रमांक

नोंदणी तारीख

मोबाईल नंबर
आधार क्रमां
नाव, आडनाव, वडिलांचे नाव

जन्मतारीख व वय


सर्व माहिती तपासून योग्य असल्यास पुढील टप्प्यात कॅम्प / शिबिर (Camp Selection) निवडायचे आहे.

कॅम्पची तारीख व ठिकाण निवडल्यानंतर तुमची अपॉईंटमेंट स्लिप डाउनलोड करता येईल.

अपॉईंटमेंटच्या दिवशी निवडलेल्या शिबिरात उपस्थित राहून तुम्हाला गृहपयोगी वस्तू संच मिळणार आहे.

सध्या कॅम्प निवडीचा पर्याय सुरू नाही

सध्या वेबसाईटवर अर्जाची सुविधा सुरू झाली असली तरी कॅम्प निवडा (Select Camp) हा पर्याय पूर्णपणे सुरू झालेला नाही. काही दिवसांत हा पर्याय उपलब्ध होणार असून त्यानंतर बांधकाम कामगारांना आपापल्या जवळच्या शिबिराची तारीख निवडता येईल.

म्हणजेच, कामगारांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. वेबसाईट अपडेट पूर्ण झाल्यानंतर सर्व कामगारांना अर्ज करता येईल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

गृहपयोगी वस्तू संच योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची गरज आहे :

बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक

आधार कार्ड

मोबाईल क्रमांक (नोंदणीवेळी दिलेला)

ओळखपत्र (जर आवश्यक असेल तर)

या योजनेचे फायदे

बांधकाम कामगारांना मोफत भांडी व गृहपयोगी वस्तू संच मिळतो.

कुटुंबाचा स्वयंपाकघराचा खर्च कमी होतो.

शासनाकडून थेट मदत मिळाल्याने कामगार कुटुंबांना दिलासा मिळतो.

ऑनलाइन पद्धतीमुळे कुठेही चकरा माराव्या लागत नाहीत.

बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध इतर योजना

महाराष्ट्र इमारत व अन्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना अनेक योजना राबवल्या जातात :

घरकुल योजना

शिष्यवृत्ती योजना

आरोग्यविषयक योजना

मृत्यू लाभ योजना

महिला व बालकल्याण योजना

बांधकाम कामगारांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. अनेक दिवस बंद असलेले भांडी वाटप आता पुन्हा सुरू झाले आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे सर्व प्रक्रिया सोपी झालेली आहे. सध्या कॅम्प निवडण्याचा पर्याय सुरू नसला तरी लवकरच उपलब्ध होणार आहे
👉 कामगार बंधूंनो, आपण अजूनही नोंदणी केली नसेल तर लगेच नोंदणी करून घ्या.

👉 गृहपयोगी वस्तू संच वाटपाबाबतच्या पुढील अपडेटसाठी अधिकृत वेबसाईट वेळोवेळी तपासत रहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या