![]() |
| महाराष्ट्र शासनाची शेळीपालन अनुदान योजना 2025 |
महाराष्ट्र शेळीपालन अनुदान योजना 2025
डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर
नमस्कार मंडळी! शेतकरी मित्रांसाठी शेतीसोबतच पशुपालन हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक मजबूत आर्थिक आधार ठरत आहे. याचाच विचार करून आता महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या माध्यमातून ग्रामीण तरुण, शेतकरी, महिला बचतगट आणि सहकारी संस्थांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
आता शेळी व मेंढी पालनासाठी शासन15 लाखांपर्यंतच्या युनिटवर तब्बल 50% पर्यंतची सबसिडी देत आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी ही सबसिडी थेट 75% पर्यंत आहे.
या योजनेचा उद्देश काय आहे पाहा
🔹 ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे
🔹 शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे
🔹 पारंपरिक पशुपालनाला चालना देणे
🔹 दूध व मांस उत्पादनात राज्याची भर घालणे
🔹 बेरोजगार तरुण-शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे
शेळीपालन अनुदान योजना 2025 ला किती अनुदान मिळणार?
👉 जर तुम्ही 100 शेळ्या आणि 5 बोकडांची युनिट सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्याचा अंदाजित खर्च सुमारे 15 लाख रुपये होतो.
👉 या खर्चावर शासन तुम्हाला 50% म्हणजेच 7.5 लाख रुपये अनुदान देतं.
👉 अनुसूचित जाती-जमातींसाठी हे अनुदान थेट 75% पर्यंत आहे.
अनुदान दोन टप्प्यांमध्ये दिलं जातं
पहिला हप्ता : प्रकल्प सुरू झाल्यावर
दुसरा हप्ता : प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर
या योजनेत कोण अर्ज करू शकतो?
✔ भारतीय नागरिक व ग्रामीण भागातील रहिवासी
✔ शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला बचतगट
✔ सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या
✔ अर्जदाराकडे पशुपालनाचा अनुभव किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास अधिक फायदेशीर)
✔ अर्जदाराकडे शेळ्यांच्या खाद्यासाठी सुविधा व योग्य जमीन उपलब्ध असावी
✔ आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडलेला असावा
✔ अनुसूचित जाती-जमातींच्या अर्जदारांनी जातीचा दाखला जोडणे बंधनकारक
✔ एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळू शकतो
✔ याआधी केंद्र/राज्य शासनाच्या शेळीपालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा
शेळीपालन अनुदान योजनावआवश्यक कागदपत्रे
📌 आधार कार्ड
📌 पॅन कार्ड
📌 रहिवासी दाखला
📌 जातीचा दाखला (लागू असल्यास)
📌 जमिनीचा सातबारा उतारा
📌 बँक कर्ज मंजुरीपत्र / स्वतःच्या निधीचा पुरावा
📌 पासपोर्ट साईज फोटो
📌 पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास)
📌 उत्पन्नाचा दाखला
📌 बँक पासबुकची प्रत
शेळीपालन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?
1) ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
MAHBMS अधिकृत पोर्टल वर भेट द्या
मोबाईल नंबर व OTP वापरून नोंदणी करा
आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा
अर्ज सादर करा
अर्जाची स्थिती पोर्टलवर तपासा
2) ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
जवळच्या पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात जा
अर्ज फॉर्म घ्या व माहिती भरा
आवश्यक कागदपत्रे जोडा
अर्ज सादर करा
विभागाकडून छाननी झाल्यानंतर मंजुरी मिळेल
यशस्वी शेळीपालनासाठी काही टिप्स
✅ जातीची निवड : उस्मानाबादी, सिरोही, जामनापुरी, बोअर अशा चांगल्या जातींच्या शेळ्या घ्याव्यात
✅ निवारा : स्वच्छ व हवेशीर शेड बांधावी
✅ चारा व पाणी : पौष्टिक चारा व स्वच्छ पाणी नेहमी उपलब्ध करून द्यावं
✅ आरोग्य : वेळोवेळी लसीकरण व पशुवैद्यकीय तपासणी करावी
✅ विमा : शेळ्यांचा विमा करून ठेवावा
✅ नियोजन : योग्य मार्गदर्शनाखाली व्यवसाय सुरू करावा
मित्रांनो, शेळीपालन हा कमी खर्चात सुरू करता येणारा, जलद उत्पादन व भरघोस नफा देणारा व्यवसाय आहे. शासनाने दिलेल्या या योजनेचा लाभ घेतल्यास शेतकरी, बेरोजगार तरुण आणि ग्रामीण महिला बचतगट यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक उत्तम संधी आहे.
या योजनेबाबत अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा किंवा MAHBMS पोर्टलला भेट द्या.

0 टिप्पण्या