![]() |
New UPI pyement ruls india |
New UPI Pyment Ruls: नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी! जर तुम्ही दररोज GPay, PhonePe, Paytm किंवा अन्य कोणतेही यूपीआय अॅप वापरून व्यवहार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण 1 ऑगस्ट 2025 पासून UPI चे नवीन नियम लागू होत आहेत आणि यामुळे काही महत्त्वाचे बदल घडणार आहेत यामध्ये 2000 रुपयेच्या UPI पेमेंटवर tax लागण्याची शक्यता आहे.
यूपीआय व्यवहारांच्या सुलभतेसाठी आणि सिस्टमवरील वाढत्या ताणामुळे NPCI (National Payments Corporation of India) ने काही तांत्रिक आणि धोरणात्मक बदल जाहीर केले आहेत.
1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणारे UPI चे नवीन नियम कोणते?
दररोज बँक बॅलन्स फक्त 50 वेळा चेक करता येईल
सध्या अनेक वापरकर्ते वारंवार बँक बॅलन्स तपासतात, ज्यामुळे NPCI च्या सिस्टमवर अनावश्यक भार पडतो. त्यामुळे 1 ऑगस्टपासून UPI अॅप्समधून बँक बॅलन्स दिवसातून जास्तीत जास्त 50 वेळा चेक करता येईल.
एकाच मोबाईल नंबरसाठी लिंक असलेले बँक अकाउंट्स फक्त 25 वेळा रिफ्रेश करता येतील
जर तुमच्या मोबाईल नंबरशी एकापेक्षा जास्त बँक खाती जोडलेली असतील, तर तुम्हाला ही माहिती उपयोगी आहे. रोजच्या व्यवहारात ही मर्यादा पार केल्यास रिफ्रेश करता येणार नाही.
या नियमांचा उद्देश काय आहे?
ऑनलाईन व्यवहार करताना फेल होणं, विलंब होणं यावर नियंत्रण ठेवणं
UPI ट्रानजॅक्शनची स्पीड सुधारणं
सर्वसामान्यांना अधिक सुरळीत व्यवहार अनुभव मिळणं
Autopay ट्रानजॅक्शनवरही परिणाम
Autopay म्हणजे:
Subscription
EMI
वीज, पाणी, मोबाईल बिल यांसारखी वेळापत्रक ठरवलेली पेमेंट
आता ऑटोपे ट्रानजॅक्शनसाठी वेळ ठरवण्यात येणार
1 ऑगस्टपासून Autopay ट्रानजॅक्शन दिवसभर कधीही करता येणार नाहीत. त्यासाठी NPCI कडून वेळेचा निश्चित स्लॉट तयार केला जाणार आहे. या वेळेतच अशा प्रकारची पेमेंट केली जाऊ शकतील.
या बदलांचा तुमच्यावर काय परिणाम होणार?
जर तुम्ही दररोज अनेक वेळा बॅलन्स चेक करत नसाल, तर तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही.
मात्र तुम्ही मोठ्या प्रमाणात व्यवहार करणारे युजर असाल (उदा. व्यवसायिक, एजंट, किरकोळ विक्रेते), तर नवीन UPI नियम तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
ट्रानजॅक्शन मर्यादा बदलली आहे का?
नाही. UPI ट्रानजॅक्शन लिमिटमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
₹1 लाख प्रतिव्यवहार मर्यादा पूर्वीप्रमाणेच राहणार
आरोग्य व शिक्षण क्षेत्रासाठी ₹5 लाख पर्यंत व्यवहार शक्य
ट्रान्सफर, स्कॅन टू पे, बिझनेस व्यवहार – पूर्वीप्रमाणे
कोणत्या UPI अॅप्सवर हे नियम लागू होणार?
सर्व प्रमुख अॅप्सवर हे नवीन नियम लागू होतील:
Google Pay (GPay)
PhonePe
Paytm
BHIM App
Amazon Pay UPI
आणि इतर सर्व UPI अॅप्स
वापरकर्त्यांसाठी काही महत्त्वाचे टिप्स
गरज नसताना वारंवार बँक बॅलन्स चेक करू नका.
Autopay ट्रानजॅक्शनसाठी NPCI कडून ठरवलेली वेळ लक्षात घ्या.
पेमेंट करताना इंटरनेट स्पीड व नेटवर्क स्थिरता तपासा.
ट्रानजॅक्शन फेल झाल्यास घाबरू नका, थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.
UPI वापरकर्त्यांनी नक्की काय लक्षात घ्यावं?
1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारांमध्ये तांत्रिक बदल होणार आहेत. UPI नवीन नियम हे सिस्टमवरील लोड कमी करण्यासाठी, व्यवहारांची गती वाढवण्यासाठी, आणि सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी लागू करण्यात आले आहेत.
हे नियम सर्व UPI वापरकर्त्यांना लागू होतील — मग ते सामान्य युजर असोत किंवा व्यापारी. त्यामुळे वेळेत या नियमांची माहिती घेऊन त्यानुसार सवयी बदलणं आवश्यक आहे.
0 टिप्पण्या