नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या जवळ एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं आहे. एका चालकाने अल्पवयीन मुलीवर कारमध्ये जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना नागपूर मध्ये घडली आहे नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) विविध कलमांत र्गुन्हा दाखल केला आहे.
मुलाने मुलीला अडकवले होते प्रेमाच्या जाळ्यात.
अटक केलेला आरोपी साहिल मनोहर चंदेल हा गाडी चालक आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या मोठ्या भावाच्या लग्नात या मुलीशी त्याची ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले आणि घटनेच्या दिवशी साहिलने १५ वर्षीय मुलीला गोड बोलून कारमध्ये बसवले आणि तिला बेलतरोडी परिसरातील एका सुन्या जागी नेले. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने विरोध केला असता ती जखमी झाली, तरीही साहिलने अमानुषपणे तिच्यावर अत्याचार सुरू ठेवला.
या घटनेनंतर घाबरलेली पीडिता घरी परतली आणि तिने कुटुंबीयांना हा सगळा प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तातडीने सदर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. आणि पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आणि अवघ्या काही तासांत साहिल चंदेल याला अटक केली. सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. आणि लवकरच या प्रकरणी आरोपीला कळक शिक्षा होणार आहे.
0 टिप्पण्या