Maharastra Rain : राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार.

Maharashtra Rain Alert राज्यात मुसळधार पाऊस

नागपूर: Maharashtra Rain Alert: राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस हजेरी लावतोय. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस हजेरी लावतोय. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय.

हवामान विभागाने आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला. गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

मराठवाड्यातील बीड, धाराशीव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.

उद्या म्हणजेच शुक्रवारीही राज्यात पावसाचा जोर राहणार आहे. उद्या विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि घाट माथ्यावरही काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.

शनिवारी कोकण, घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला.

तर विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यात जोरदार तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामाना सह हलक्यासरी पडतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या