![]() |
Ladki Bahin Yojana June Installment |
Ladki Bahin Yojana June Installment:
आता पावसाळा लागला आणि शेतीचे काम सुरु झालेत त्यामुळे राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे तरी जून मधेच येतील अशी अपेक्षा होती.
मात्र सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे या महिन्यालाही लाडक्या बहिणींना १२ हप्त्याचे पैसे हे जुलै महिन्यातच मिळणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाला निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. अशी माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
Ladki Bahin Yojana June Installment Maharashtra: लाडकी बहिणीचे पैसे जमा होण्यास होणार सुरुवात
आज विधानभवनाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत की, “लाडकी बहिणींना जून महिन्याच्या हप्त्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिला असून उद्यापासून राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये यांचे वितरण करण्यात येणार आहे.”
त्यामुळे महिला व बालविकास विभाग अॅक्टिव्ह मोडमध्ये आले असून सर्व अर्जांची परत एकदा छाननी सुरु केली आहे.
या महिलांना मिळणार नाही हप्ता
ज्या महिला सरकारी नोकरी करतात किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना मात्र आता Ladki Bahin Yojana June Installment मिळणार नाही आहे. शासनाने अशा सर्व महिलांना अपात्र केलेलं आहे, जेणेकरून ज्या महिलांना खरंच या योजनेच्या लाभाची आवश्यकता आहे त्यांना लाभ दिला मिळेल.
निकषांमध्ये बसून सुद्धा हप्ता आला नसेल, तर करा हे काम
अधिकृत रित्या प्राप्त माहितीच्या आधारे एक लाख महिलांच्या खात्यामध्ये पात्र असून सुद्धा योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत.
याचे कारण स्पष्ट करताना असेही सांगण्यात आले आहे की, हि रक्कम शासनांकडेच जमा आहे कारण महिलांच्या बँक खात्यांची EKYC केलेली नसल्यामुळे हि रक्कम बँकांनी होल्ड केली आहे.
सरकारी नोकरी व 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला अपात्र
EKYC न झाल्यास हप्ता रोखला जातो
जर हप्ता मिळालेला नसेल आणि तुम्ही पात्र असाल, तर तात्काळ तुमचे बँक खाते EKYC करून घ्या आणि नजिकच्या महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा.
0 टिप्पण्या