मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: जुलै महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार, शासन निर्णय प्रसिद्ध.


Ladki Bahin Yojna July Hapta

Ladki Bahin Yojna July Hapta : नमस्कार नमस्कार मंडळी राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये 8 ते 10 दिवसांच्या आत थेट जमा (DBT) होणार असल्याची माहिती आहे. याबाबतचा शासन निर्णय (GR) अखेर आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार तसेच पात्र एक अविवाहित महिलेला दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामागचा उद्देश महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आरोग्य सुधारणा, पोषण, आणि कुटुंबातील निर्णयक्षमतेला बळकटी देणे हा आहे.

शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे

Ladki bahin Yojna July GR दिनांक: 30 जुलै 2025

जुलै महिन्याचा हप्ता 8 ते 10 दिवसांत लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे निधी वितरण

2025-26 आर्थिक वर्षासाठी तरतूद: ₹28,990 कोटी

यापैकी ₹2,984 कोटी रक्कम जुलैसाठी वितरित

केवळ पात्र महिलांनाच जुलैचा हप्ता मिळणार – ज्यांना जूनचा हप्ता मिळालाय, त्यांनाच जुलैचा मिळेल

26 लाख महिलांना तात्पुरती अपात्रता

या योजनेत सध्या 26 लाख महिलांना तात्पुरते अपात्र करण्यात आले आहे. त्यांचा पुनर्विचार शासनाकडून सुरू असून, याबाबतची स्पष्टता येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित महिलांनी सावध राहावे आणि खात्यावर लक्ष ठेवावे.

महिलांनी काय करावे?

आपले बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक

जून महिन्याचा हप्ता मिळालेल्या महिलांनाच जुलैचा मिळेल

शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर GR आणि योजनेची माहिती वाचा

कोणत्याही गैरवर्तनास बळी पडू नका, कोणालाही पैसे देऊ नका

राज्य सरकारकडून महिलांसाठी सुरू केलेली ही महत्त्वाची योजना त्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे. लाभार्थींनी सरकारी अद्ययावत माहितीचा आधार घ्यावा, अफवांपासून दूर राहावे आणि आपल्या हक्काच्या सहाय्यासाठी सतर्क राहावे.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या