१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! १० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळनार – असा करा अर्ज.

10th 12th pass scholarship Maharashtra : बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार १० हजार रुपये स्कॉलरशिप महाराष्ट्रातली सरकारी योजना.

10th 12th pass students scholarship yojana

मुंबई: नमस्कार मित्रांनो राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी राज्य सरकारकडून एक महत्वाची शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये १०वी किंवा १२वीमध्ये किमान ५०% गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना १०,००० रुपयांची शैक्षणिक मदत दिली जाणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा कोणते कागदपत्रे लागतात त्याची संपूर्ण माहिती दिली आहे.

ही योजना नेमकी काय आहे?

‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळा’च्या माध्यमातून ही योजना चालवली जाते. उद्देश असा की, कामगारांच्या मुलांना शिक्षणात सातत्य राखता यावे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळावा.

पात्रता काय?

पालक महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक.

विद्यार्थी महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.

विद्यार्थ्याने १०वी किंवा १२वीत ५०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले असावेत.

फक्त दोन मुलांनाच लाभ मिळतो.

किती रक्कम मिळते?

विद्यार्थ्याच्या खात्यात १०,००० रुपये थेट जमा केले जातात.

रक्कम एकदाच मिळते – पण पुढील अभ्यासासाठी ती उपयुक्त ठरते.

अर्ज कसा करायचा?

सध्या ही अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आहे. खाली दिलेल्या टप्प्यांनुसार अर्ज करावा लागतो:

१) अर्ज डाउनलोड करा:

mahabocw.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
→ Welfare Scheme
→ Education
→ “10th to 12th Student's 10,000/yr”
→ “Download Form” वर क्लिक करा

२) अर्ज भरा:

कामगाराची माहिती: नाव, नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर इ.

विद्यार्थ्याची माहिती: नाव, जन्मतारीख, शाळेचे नाव, गुण वगैरे

३) बँक तपशील भरा:

खात्याचे नाव

IFSC कोड

बँकेचे नाव

आधार लिंक असलेले खातेच असावे

४) अर्ज सादर करा:

सर्व कागदपत्रांसह कामगार कार्यालयात जमा करा

पावती घ्या – अर्जाची तारीख व युनिक क्रमांक असतो

आवश्यक कागदपत्रांची यादी:

पालकाचा कामगार नोंदणी क्रमांक

विद्यार्थी फोटो

गुणपत्रिका (१०वी/१२वी – ५०% गुण आवश्यक)

बँक पासबुक (झेरॉक्स)

आधार कार्ड

रहिवासी दाखला

प्रवेश पावती

शाळा/कॉलेज आयडी

बोनाफाईड प्रमाणपत्र

७५% हजेरी दाखला

पैसे मिळाले का ते कसे तपासाल?

mahabocw.in ला भेट द्या

“Various Scheme Benefits Transferred” लिंक ओपन करा

जिल्हा, नाव किंवा बँक तपशील टाका

‘Scheme’ मध्ये E02 निवडा
→ तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही, ते इथे पाहता येते

शेवटचा सल्ला

अर्ज लवकरात लवकर करा

योग्य कागदपत्रांची पूर्तता ठेवा

फॉर्म भरताना चूक टाळा – अन्यथा अर्ज फेटाळला जाऊ शकतो

🔗 अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट:
👉 https://mahabocw.in


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या