मोदी तुमचा बाप असू शकतो, शेतकऱ्यांचा नाही!’ असे म्हणताच नाना पटोले यांना निलंबीत करण्यात आले.

नाना पटोले यांना अधिवेशनात निलंबीत करण्यात आले.

Nana patole vidhansabha News : मुंबई,नमस्कार मंडळी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी शेतकऱ्यांविरोधातील वक्तव्यांचा निषेध करत जोरदार गदारोळ केला. या प्रकरणामुळे सभागृहात शिस्तभंग झाला असे म्हणत स्पीकर राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केलं. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, विरोधकांनीही सरकारवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही.

नक्की काय घडलं प्रकरण ?

सोमवारी, विधानसभेच्या प्रश्नोत्तर काळानंतर सभागृहात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला.
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांना केंद्र सरकारमुळे मोबाइल, कपडे, पैसे मिळाले, असे विधान केले. यावरून संतप्त झालेल्या नाना पटोले यांनी या विधानांचा निषेध करत सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर आमदारही आक्रमक होत मंचासमोर आले. नाना पटोले स्वतः स्पीकरच्या आसनाजवळ धाव घेत प्लॅटफॉर्मवर चढले आणि आक्रमक घोषणा देत सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य कोणतं होतं?

कृषीमंत्री मनिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, "कर्जमाफीचा पैसा शेतकरी लग्न आणि खाजगी खर्चासाठी वापरतात."

यावरून नाना पटोले यांनी सरकारवर टीका करत सांगितलं की, "हे वक्तव्य म्हणजे संपूर्ण शेतकरी वर्गाचा अपमान आहे."

पटोले म्हणाले 

“मोदी तुमचा बाप असेल, पण शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही!”

ही तीव्र प्रतिक्रिया सभागृहात वातावरण अधिकच तापवणारी ठरली. नाना पटोले हे नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजू अधिवेशनात मांडत असतात शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी ते राजकारणामध्ये सक्रिय पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात नाना पटोले हे एक शेतकरी कुटुंबातून असून त्यांना शेतकऱ्याची जाण आहे आणि म्हणून ते शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे असतात.

स्पीकर आणि मुख्यमंत्री काय म्हणाले?

सभागृहात शिस्तभंग केल्याने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांना लगेच एक दिवसासाठी निलंबित केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं
“सभागृहात असा अराजकता प्रकार खपवून घेतला जाणार नाही. लोकशाही प्रक्रियेत संयमाची गरज असते.”

फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटलं की नाना पटोले यांनी माफी मागावी. मात्र काँग्रेसकडून कोणतीही माफी मागितली गेली नाही.

काँग्रेस व विरोधकांचा निषेध

निलंबनाच्या निर्णयावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून वॉकआऊट केला.
त्यांनी शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधातही कारवाईची मागणी केली.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं

“शेतकऱ्यांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याऐवजी, आवाज उठवणाऱ्यांवरच शिक्षा केली जात आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही.”

नाना पटोले यांची स्पष्ट भूमिका

निलंबनानंतर सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले

“मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. मी त्यांचा आवाज सभागृहात पोहोचवतोय. सरकारच्या वाघिणी वाटणाऱ्या नेत्यांच्या अशा वक्तव्यांना विरोध करणे हे माझे कर्तव्य आहे.”

संपूर्ण विरोधक आता सरकारविरोधात आक्रमक झाले असून, विधानसभेतील आगामी सत्रात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चांगलाच गदारोळ होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी काँग्रेसने मोठ्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

नाना पटोले यांचे निलंबन केवळ व्यक्तिक आरोपांपुरते मर्यादित नाही, तर यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. लोकशाहीत सरकारवर टीका करणं आणि आवाज उठवणं विरोधकांचा अधिकार असतो. त्यामुळे हे निलंबन योग्य की अयोग्य, यावरून आता राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झालेला दिसतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या