Maharashtra Rain: राज्यात पुन्हा पावसाचा इशारा; कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट.


मुंबई : नमस्कार मंडळी कसे आहात राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असतानाही हवामान विभागाने येत्या पाच दिवसांसाठी नव्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामूळे या पाण्याचा शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी पेरणी साठी फायदा होइल.

कोकण, विदर्भ, मराठवाडा येलो अलर्टच्या कक्षेत

हवामान विभागाने आज कोकण आणि विदर्भातील सर्व जिल्हे, तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी वाऱ्यासह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.

घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट

मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर येत्या काही तासांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, या भागातील नागरिकांनी आणि प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचा पुढील अंदाज काय?

उद्या म्हणजेच रविवारी कोकण आणि घाटमाथ्यावर, तसेच विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांत देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या इतर भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात.

राज्याबाहेरही मान्सूनचा वेग

हवामान विभागानुसार, मान्सूनने बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, संपूर्ण मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाखच्या काही भागात यशस्वीपणे प्रवेश केला आहे. सध्या मान्सूनची सीमा जयपूर, आग्रा, रामपूर, देहरादून, शिमला आणि मनाली या भागांपर्यंत पोहोचली आहे.

पुढील दोन दिवस महत्त्वाचे

पुढील दोन दिवसांत राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद आणि लडाखच्या उर्वरित भागांमध्ये मान्सूनचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. तसेच दिल्ली, चंदीगड, पंजाब, हरियाणा या भागांमध्येही पावसासाठी पोषक हवामान असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या