Jalna Farmer Children Death : वीजेच्या झटक्याने बाप-लेकांना आयुष्यतून कायमचां निरोप दिला, जालन्यातील हृदयद्रावक घटना!

Jalna Farmer Children Death Related Image 

Digital Gaavkari News
Durgaprasad Gharatkar.

जालना: एक दुर्दैवी सकाळ, एक शेत, आणि त्या शेतात घडलेली अशी एक शोकांतिका — जी दगडालाही पाझर फोडेल!

मित्रांनो, जालना जिल्ह्यातील वरुड गावातून एक अंगावर काटा आणणारी दु:खद घटना समोर आली आहे. ही घटना एकाच कुटुंबातील तिघांच्या आयुष्यावर काळाचा घाला बनून आली आहे — एक शेतकरी वडील आणि त्याची दोन लहान गोंडस मुलं विजेच्या धक्क्याने कायमची या जगातून निघून गेली...

काय घडलं होतं नेमकं ?

वरुड गावातील शेतकरी विनोद मसके आपल्या शेतात सकाळी मल्चिंग पेपर लावत असताना, शेतात पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. ते जागच्या जागी कोसळले.

या घटनेवेळी त्यांच्या शेजारीच त्यांची दोन लहान मुलं श्रद्धा विनोद मसके (वय - ६ वर्षे) समर्थ विनोद मसके (वय - ८ वर्षे) शेतात खेळत होती. वडील अचानक का कोसळले, हे पाहण्यासाठी ती दोघं धावत गेली.

तेव्हा त्यांना काय ठाऊक होतं — वडिलांना हळूच स्पर्श करणं हे त्यांच्या आयुष्यातील शेवटचं पाऊल ठरणार आहे! वडिलांना हलवण्यासाठी त्यांनी हात लावला, आणि विजेचा धक्का त्यांनाही बसला... दोघंही तिथेच कोसळले!

या घटनेने एका आईचा दु:खद आक्रोश.

बराच वेळ होऊन गेला, पण नवरा आणि मुलं घरी परतत नाहीत, म्हणून विनोद यांची पत्नी त्यांना शोधायला शेतात गेली. शेतात दिसलेलं दृश्य तिच्या आयुष्याचं सर्वस्व हादरवून टाकणारं होतं. नवरा आणि दोन चिमुकली मुलं — तिघंही मृतावस्थेत...” ते पाहून ती जोरात किंचाळली. आवाज ऐकून गावकरी धावून आले आणि तिघांनाही तात्काळ जालन्याच्या खासगी रुग्णालयात हलवलं. पण...

डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं! या घटनेनंतर संपूर्ण वरुड गाव शोकसागरात बुडालं आहे. कोणाच्याही काळजाला हादरा देणारी ही शोकांतिका आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे.

प्रशासनाची हलगर्जी? की अपघात?

या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतांमधून गेलेल्या वीज तारांबाबतच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. – वीज वितरण कंपनीकडून वेळोवेळी तपासणी केली गेली असती, – झुकलेल्या, तुटलेल्या वीज तारांचं देखभाल काम वेळेवर झालं असतं, तर आज एक कुटुंब उध्वस्त झालं नसतं!

स्थानिक प्रशासनाने त्वरित मदतीची घोषणा करावी

या घटनेची सखोल चौकशी व्हावी, शोकग्रस्त कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी, आणि इतर शेतांमध्ये असलेल्या धोकादायक वीज तारांची देखभाल त्वरित व्हावी, अशी गावकऱ्यांची जोरदार मागणी आहे.

श्रद्धा आणि समर्थ ही दोन निष्पाप मुलं आणि त्यांचे वडील — एका विजेच्या झटक्याने कायमची या जगातून निघून गेले. या घटनेनं आईवर आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा आभाळ कोसळलं आहे...

"एक बाप... आणि दोन लेकरं... मृत्यूने तिघांनाही एकाचवेळी कवेत घेतलं..."

"DigitalGaavkari.in" या माध्यमातून आम्ही या पवित्र आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. देव त्यांच्या आत्म्यांना शांती देवो. आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या